Nashik News: बाजार समितीचा कारभार पुन्हा संचालक मंडळाकडे; प्रशासकांची नियुक्ती शासनाकडून रद्द

Nampur Bazar Samiti
Nampur Bazar Samitiesakal

Nashik News : कृषी उत्पन्न विकास व विनिमय अधिनियम १९६३ चे कलम १४(३) चा दुसऱ्या परंतुकानुसार सदस्यांचा पदावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रण बाहेर असलेल्या कारणांमुळे समिती सदस्यांची निवडणूक घेणे शक्य नसल्याचे नामपूर, सटाणा बाजार समितीची पदभार सहा महिन्यासाठी पुन्हा संचालक मंडळाकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यामुळे पुढील सहा महिन्यापर्यंत बाजार समितीवर संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. (Management of Market Committee back to Board of Directors Appointment of administrators canceled by Govt Nashik News)

सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २० जून २०२३ रोजी संपणार असल्यामुळे संचालक मंडळाने १० एप्रिल २०२३ रोजी च्या संचालक मंडळाच्या सभेत मुदतवाढ मिळणे बाबतचा ठराव पारित केला होता.

मात्र जिल्हा उपनिबंधक यांनी दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी थेट प्रशासकाची नियुक्ती केली होती.

कृषी उत्पन्न विकास व विनिमय अधिनियम १९६३ चे कलम १४(३) चा दुसऱ्या परंतुकानुसार सदस्यांचा पदावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रणा बाहेर असलेल्या कारणांमुळे समिती सदस्यांची निवडणूक घेणे शक्य नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.

राजपत्रातील आदेशानुसार वेळोवेळी कोणतेही अशा समितीचा पदावधी वाढवता येईल मात्र अशा प्रकारे वाढविण्यात आलेला पदावधी एक वर्षाहून अधिक असणार नाही असेही नमूद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nampur Bazar Samiti
Nashik Onion Crop Crisis: पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचण; शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ

त्यामुळे नामपुर व सटाणा या दोन्ही बाजार समिती संचालक मंडळास मुदतवाढ देणे योग्य राहील अशी शासनाची खात्री झाल्याने प्रशासकाची नियुक्ती रद्द करून प्रशासक नियुक्ती पूर्वी कार्यरत असलेल्या संचालक मंडळास पुनर्स्थापित करून अधिकार प्रदान करण्याचे आदेश शासनाच्या पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव सं. धपाटे यांनी शासन आदेश पारित करून केले आहे.

यामुळे प्रशासकाचे कामकाज थांबवले असून सोमवार (ता. ६) पासून संचालक मंडळाकडे पुन्हा सहा महिन्यासाठी (३ फेब्रुवारी २०२४ किंवा निवडणुक होईपर्यंत) बाजार समित्यांचा कार्यभार सुपूर्द करण्यात येणार आहे.

आदेशात काही विशिष्ट व अपवादात्मक परिस्थिती या संचालक मंडळास धोरणात्मक निर्णय घ्यायचा असल्यास शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही अशी सत्ता अटही आदेशात नमूद केली आहे.

एकूणच येत्या सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पायात घुंगरू बांधलेल्या पॅनल प्रमुखांसह इच्छुक उमेदवारांच्या मनसुभ्यांवर या शासन निर्णयाने पाणी फिरल्याचे चित्र आहे.

Nampur Bazar Samiti
Nashik News: राज्यातील 12 लाख बसची तिकीट तपासणी; वर्षभरात 6589 फुकट्या प्रवाशांकडून 16 लाख वसूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com