Manikrao Kokate on Ajit Pawar: सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी अजित दादांबरोबरच : आमदार कोकाटे

Manikrao Kokate on Ajit Pawar
Manikrao Kokate on Ajit Pawaresakal

विकास गिते

Manikrao Kokate on Ajit Pawar : राज्यातील रविवारी दुपारी अतिशय वेगवान घडामोडी घडत राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी भाजपासोबत घरोबा करीत सत्ता मिळवली.

यावेळी अजित दादा पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर उर्वरित आठ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याने सर्वांच्या मतदारसंघात एकच खळबळ उडाली होती.

त्यात अजित दादा यांचे अतिशय जवळचे संबंध असलेले व विश्वासू सिन्नर तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे हे रविवारी खुद्द नाशिक मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या होत्या.

अशा वेळी सर्वांच्या नजरा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यावर आमदार कोकाटे यांच्यावर लागलेले असताना आमदार कोकाटे दादांसोबत आहेत की साहेबांसोबत याची चर्चा तालुक्यातील व जिल्ह्यात होऊ लागली होती. (Manikrao Kokate statement on Ajit Pawar nashik poitical news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Manikrao Kokate on Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

अशावेळी सोमवारी सकाळी स्वतः आमदार माणिकराव कोकाटे यांनी सकाळ शी बोलताना असे सांगितले की, मी दादांसोबत असून दादांचे काम हे अतिशय पारदर्शक असून माझ्या मतदारसंघासाठी अजितदादांनी निधी अनेक वेळा दिलेला असून त्यांचे कामाचे स्वरूप अतिशय नियोजनबद्ध असून. मी जवळून मंत्रालय बघितले असता. माझ्या मतदारसंघातील विकास कामे होण्यासाठी अजित दादाच मदत करतील.

माझा संपूर्ण तालुका व मी स्वतः अजित दादांबरोबरच आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मी जे काही सांगतो ते डंके की चोट पे सांगतो. असे त्यांनी स्पष्ट सांगितले. पक्षअध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व आणि संघटन या जमेच्या बाजू आहेत.

मात्र विधानमंडळात संरक्षण देणारे आमचे नेते अजित दादा पवार असून माझ्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून खूप असून त्या सर्व पूर्ण करण्यासाठी व विकासाची गंगा आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Manikrao Kokate on Ajit Pawar
Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादीतील महाभारत नेत्यांसह कार्यकर्तेही 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत; ठाकरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com