esakal | कोरोनाच्या प्रादुर्भावावर लॉकडाउन उपाय की अपाय? सखोल अभ्यासाची माणिकराव शिंदेंची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

कोरोनाच्या प्रादुर्भावावर लॉकडाउन उपाय की अपाय?

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : जगात सर्वत्र लॉकडाउन (lockdown) प्रभावी ठरत आहे तर, मग भारतातही तोच उपाय योग्य की अयोग्य? आपल्या दाट (corona virus) लोकवस्तीत आर्थिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीत लॉकडाउन उपयोगाचा ठरताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या जबरदस्तीऐवजी २४ तास आठवड्याचे सातही दिवस अनलॉकची जबरदस्ती केली तर? याचाही अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत येथील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केले. (manikrao-shinde-about-lockdown)

कोरोनाच्या प्रादुर्भावावर लॉकडाउन उपाय की अपाय?

कोरोनाचे दुसरे वर्ष पूर्णत्वाकडे झुकले आहे. मागील वर्षीचा लॉकडाउन त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न, जनतेचे, मजुरांचे हाल, वाढलेली बेकारी, पुन्हा कोरोनाची आलेली दुसरी लाट व तिसऱ्या लाटेचे भाकीत नजरेपुढे येताना मनात निर्माण होणारी भीती, मानसिक आजारपण, नैराश्य हे त्याहूनही भयंकर आहे. दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनपुरवठ्याच्या समस्या, रेमडेसिव्हिरची गरज, त्यातून झालेला काही ठिकाणचा काळाबाजार आणि आता रेमडेसिव्हिर कोरोनावर फार गुणकारी नाही हा निघालेला शासनाचा निष्कर्ष किती अनिश्चित आहे. सुरवातीला लस घेण्यास अनुत्सुकता व आता होणारी घाईगर्दी या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि त्याची उपयुक्तता याचादेखील फेरविचार होणे गरजेचे वाटते.

हेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी

सखोल अभ्यास करण्याची माणिकराव शिंदेची मागणी

अनेक देशात कोरोना आलाही आणि आटोक्यातही येत आहे.भारतातही केंद्र सरकार पासून विविध राज्य सरकारे कोरोनावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु भारतात लॉकडाउनसारखा उपाय सामान्य माणसांचे, गरिबांचे कंबरडे मोडणारा, अर्थव्यवस्था मोडीत काढणारा, सुशिक्षिताचीही बेकारी वाढवणारा अपाय तर करत नाही ना? हा प्रश्न निर्माण होतो. त्यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या मुद्यावर शासनाकडून अभ्यास व्हावा असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: गोपानाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस ६ एप्रिलपर्यंत मान्यता