मनमाड: धम्म यात्रेच्या नावाखाली मनमाड शहर व परिसरातील १९ नागरिकांची एकूण सात लाख ३४ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर येथील दोघांविरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांनी यात्रेचे कोणतेही आयोजन न करता आगाऊ घेतलेली रक्कमही परत केली नाही.