Crime
sakal
मनमाड: विवाहासाठी योग्य मुली न मिळणे आणि एजंटांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. ‘लुटेरी दुल्हन’चे किस्से वारंवार समोर येत असतानाच मनमाडजवळ अशाच एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ उडवून दिली. एजंटाच्या मध्यस्थीने विवाह झाल्यावर अवघ्या काही दिवसांत वधू फरारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दहा जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.