Manoj Jarange Patil: आरक्षणात खोडा घालणाऱ्यांचा ‘योग्य’ कार्यक्रम करणार; मनोज जरांगे-पाटील यांची सभेत ग्वाही

मनोज जरांगे पाटील: आरक्षणात खोडा घालणाऱ्यांचा ‘योग्य’ कार्यक्रम करणार; मनोज जरांगे-पाटील यांची सभेत ग्वाही
manoj jarange patil
manoj jarange patil Esakal

Manoj Jarange Patil : शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांसाठी लढले. त्यांच्या आरक्षणात खोडा घालणाऱ्यांचा ‘योग्य’ कार्यक्रम टप्प्यात येताच करेल, अशी ग्वाही मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (ता. २१) येथे दिली. (Manoj Jarange Patil statement about people opposing maratha reservation nashik news)

छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेदहाला मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की माझी तब्येत ठीक नसतानाही मी २४ तास मराठा समाज बांधवांच्या भेटी घेऊन आपली ऐकी राखण्यासाठी आवाहन करीत आहे. ३२ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून, आता एक कोटी मराठा समाज बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आरक्षण आपल्या जवळ आले आहे.

त्यामुळे मराठ्यांची वज्रमूठ एक ठेवा, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काहींनी कशाकशात लाभ उठवले, ही मी सांगण्याची गरज नसून त्यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे असून, वेळ येताच कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, अशी मी ग्वाही देतो. सध्या फक्त आरक्षण हाच विषय असल्याने उद्याच्या सभेत मी सगळे सविस्तर सांगेन, असेही ते म्हणाले.

manoj jarange patil
Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील

आज या सभेत येताना पहिली वेळ अशी आली, की मला स्टेजवरून खाली येऊन जागा करावी लागली व शांतता करावी लागली. मी तुमच्या बळावर लढाई लढत असताना अशी ढकला ढकलीची वेळ आणणे गैर आहे.

आयोजकांना सुनावले खडेबोल

सभेसाठी आठची वेळ देण्यात आली होती. तोपर्यंत खेड्यापाड्यांतून स्री-पुरुष हजर होते. जरांगे-पाटील स्टेजवर येताना त्या भागात रेटारेटी झाल्याने आयोजकांना त्यांनी खडेबोल सुनावले. स्टेजवर जरांगे-पाटलांशिवाय एकाही व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी लोकांनी मनाई केली. उशीर झाल्याने कार्यक्रम जरांगे पाटलांच्या भाषणाने सुरू झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. एका मुलीच्या हस्ते त्यांना तलवार देण्यात आली.

manoj jarange patil
Manoj Jarange Patil : भुजबळांनी लोकांचे खाल्ले, रक्त पिले, त्यामुळे जेलवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com