esakal | नाशिक शहरातील 2 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर; अनेक विद्यार्थी ऑनलाइनपासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

government schemes for students who have lost parents due to corona

नाशिक शहरातील 2 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे (Corona) ऑनलाइन शिक्षणावर (Online Education) भर देण्यात आला असलातरी महापालिकेच्या शाळांमधील २६ हजार ३० विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १४३ विद्यार्थ्यांनाच या प्रकाराची सुविधा प्राप्त झाली, तर ८, ८३८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवरच शिक्षण घ्यावे लागले. २,०४९ विद्यार्थी असे आहेत की, त्यांच्याकडे ऑनलाइन व पाठ्यपुस्तक या दोन्हींची सुविधा नसल्याने शिक्षणाच्या प्रवाहातूनच बाहेर फेकले गेल्याचा अंदाज शिक्षण विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आला आहे.

शिक्षणाबद्दल जागृती निर्माण होणे गरजेचे

शहरात महापालिकेच्या ८८ प्राथमिक शाळा आहेत. या शाळेत २२ हजार ४७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे, तर तेरा माध्यमिक शाळांमध्ये ३, ५५१ विद्यार्थी शिकत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडू नये, यासाठी महापालिकेच्या शिक्षकांनीदेखील ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देता आले नाही. मुळात शिक्षणाबद्दल जागृती नसल्याने गेल्या पावणेदोन वर्षांपासून शिक्षकांनाच विद्यार्थ्यांशी संपर्क करावा लागत आहे. त्यात २६ हजार ३० विद्यार्थ्यांपैकी पंधरा हजार १४३ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था झाली. आठ हजार ८३८ विद्यार्थ्यांकडे मोबाईल, टॅब, तसेच नेटवर्कच्या सुविधा नसल्याने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागले. शिक्षकांकडून गृहीभेटीतून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला गेला त्यातील दोन हजार ४९ विद्यार्थ्यांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले होते. त्या अहवालाच्या आधारे दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हेही वाचा: शालेय शिक्षणाचं चांगभलं! ‘बॅकडेटेड’ मान्यतांची धूम सुरूच

शिक्षण प्रवाहाबाहेर फेकले गेल्याची कारणे

- रोजगार हिरावले गेल्याने आर्थिक अडचण.

- कारखान्यांमधील कामगार कपात.

- रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबीयांचे स्थलांतर

''ऑनलाइन शिक्षणासाठी गृहभेटींच्या माध्यमातून साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाल्याने महापालिकेच्या शाळांमधील २०४९ विद्यार्थ्यांशी संपर्क होत नाही.'' - सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

हेही वाचा: चाळिशीनंतर लायसन्स काढायचंय? 'हे' असेल आवश्यक!

loading image
go to top