इगतपुरी: मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आंदोलनस्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्न-पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी सोमवारी (ता. १) तालुक्यातील बांधवांनी विशेष पुढाकार घेतला.