esakal | Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये साहित्य संमेलन 'या' महिन्यात शक्य; भुजबळांशी चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

sahitya sammelan

नाशिकमध्ये साहित्य संमेलन नोव्हेंबर अथवा जानेवारी शक्य

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाच्या (coronavirus) पार्श्‍वभूमीवर वेगाने तयारी सुरू असलेले नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने गुरुवारी (ता.७) पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्याशी साहित्य संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे १९ ते २१ नोव्हेंबरला की जानेवारीमध्ये संमेलन घ्यायचे असे सूत्र चर्चेमध्ये राहिले.

पालकमंत्र्यांसमवेत चर्चा; ठाले-पाटलांशी होणार विचारविनिमय

जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, विश्‍वास ठाकूर, सुभाष पाटील आदी चर्चेसाठी उपस्थित होते. भुजबळ नाशिकमध्ये आले, की साहित्य संमेलनाविषयक चर्चा समितीतर्फे करण्यात आल्या आहेत. मात्र संमेलन घेण्यासाठी परिस्थिती निवळेपर्यंत नेमक्यापणाने संमेलन आयोजनाचा निर्णय होत नव्हता. आजच्या चर्चेतून निर्णयाबद्दलची नेमकी स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. चर्चेची पुढील फेरी शुक्रवारी (ता. ८) नाशिकमध्ये होणार आहे. त्यामध्ये संमेलन घेण्याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. विधीमंडळाचे अधिवेशन डिसेंबरमध्ये अपेक्षित असल्याने संमेलनासाठी डिसेंबर हा महिना उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये संमेलन करण्यात काही अडचणी आल्यास जानेवारी २०२२ चा विचार होऊ शकतो. अंतिम निर्णय झाल्यावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेतली जाणार आहे. त्यानंतर संमेलनाचा मुहूर्त निश्‍चित होईल.

हेही वाचा: नाशिक : कोटमगावला फक्त ऑनलाईन दर्शन! चारही बाजूचे रस्ते बंद

हेही वाचा: नाशिक शहरात दररोज होणार सहा हजार चाचण्या

loading image
go to top