Marathwada Water Rights Council Petition for Regulation Pressure to release water by appearance of agitation in nashik news)
Marathwada Water Rights Council Petition for Regulation Pressure to release water by appearance of agitation in nashik news)Sakal

Nashik Marathwada News: आंदोलनाचा देखावा करून पाणी सोडण्यासाठी दबाव; मराठवाडा पाणी हक्क परिषदेची नियमनकडे याचिका

Nashik Marathwada News : जायकवाडीला नाशिक व नगरच्या धरणांतून जवळपास साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यासाठी नकार देताना नाशिकमध्ये मोठे आंदोलन उभारले जात असल्याचा दावा करत मराठवाडा पाण्याचा परिषदेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन अधिकाराकडे याचिका दाखल केली आहे. (Marathwada Water Rights Council Petition for Regulation Pressure to release water by appearance of agitation in nashik Marathwada news)

दरम्यान, नाशिकमध्ये अशा प्रकारचे कुठलेच आंदोलन होत नसतानाही मोठ्या आंदोलनाचा देखावा निर्माण करून पाणी सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.

मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असेल तर वरच्या धरणांमधून अर्थात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरून समूहातून पाणी सोडावे, असे मेंढीगरी समितीच्या अहवालात म्हटले आहे. त्याअनुषंगाने धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या विरोधात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्या संदर्भात लवकरच सुनावणी होणार आहे.

Marathwada Water Rights Council Petition for Regulation Pressure to release water by appearance of agitation in nashik news)
Nashik Water Scarcity: नाशिक शहरासाठी 6159 दलघफू पाणी आरक्षित; गंगापूरचे पाणी सोडल्यास शहरावर पाणीकपातीचे संकट

त्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये पाणी सोडण्यावरून मोठे असे आंदोलन झालेले नाही. लोकप्रतिनिधींनीदेखील फारसा विरोध केला नाही.

गंगापूर धरण समूहातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी देण्यास फारसा विरोध झाला नसताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र नाशिकमध्ये मोठे आंदोलन निर्माण झाल्याचा देखावा निर्माण करून तणाव निर्माण केला जात आहे. यामुळे नाशिक, नगर व मराठवाडा, असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

Marathwada Water Rights Council Petition for Regulation Pressure to release water by appearance of agitation in nashik news)
Nashik News: जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वपक्षीय आमदारांचा विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com