esakal | झेंडूची विक्री चढ्या दरानेच; लक्ष्मीपुजेसाठी एक फुल २ ते ३ रुपयाला
sakal

बोलून बातमी शोधा

marigold.jpg

पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक राहिल्याने एका क्रेटसाठी शनिवारी (ता 14) सकाळी तीनशे ते चारशे रूपये मोजावे लागले. दुपारनंतर मात्र, भाव काहिसे कमी झाले तरी शेकड्याला दोनशे रूपये दर कायम होता. शेकड्याबरोबरच अनेक शेतक-यांनी किलो तसेच क्रेट अशीही विक्री केली.

झेंडूची विक्री चढ्या दरानेच; लक्ष्मीपुजेसाठी एक फुल २ ते ३ रुपयाला

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : अवकाळीमुळे इतर पिकांबरोबरच झेंडूचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दिवाळीतही झेंडूच्या फुलाचे भाव तेजीतच होते. मागणी वाढूनही किरकोळ बाजारात शंभर फुलांसाठी दोनशे ते तीनशे रूपये मोजावे लागले.

ग्राहकांची पसंती क्रेट खरेदीस अधिक 

लक्ष्मीपुजेसाठी काल शुक्रवारी (ता. 13) मध्यरात्रीपासून गंगाघाटावरील फुलबाजारात शेकडा, क्रेट व किलो अशा तीन प्रकारात झेंडू उपलब्ध होता, तरी ग्राहकांची पसंती क्रेट खऱेदीला अधिक होती. अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे एकतर आधीच मंदिरे बंद असल्याने यंदा शेतक-यांनी झेंडुच्या फुलांची फारशी लागवड केली नव्हती. त्यामुळे दस-याला या फुलांचे दर चढेच राहिले. त्यानंतर आलेल्या दिवाळीतही पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक राहिल्याने एका क्रेटसाठी शनिवारी (ता 14) सकाळी तीनशे ते चारशे रूपये मोजावे लागले. दुपारनंतर मात्र, भाव काहिसे कमी झाले तरी शेकड्याला दोनशे रूपये दर कायम होता. शेकड्याबरोबरच अनेक शेतक-यांनी किलो तसेच क्रेट अशीही विक्री केली.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

कृत्रिम फुलांची विक्री

बाजारात हुबेहुब झेंडुच्या फुलांसारखेच दिसणारे कृत्रिम फुलांचे हार बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांसह महिलांनी या कृत्रिम फुलांच्या हारांना पसंती दिली. बाजारात पन्नास रूपयांपासून उपलब्ध होते. विशेष म्हणजे धुतल्यावर ही फुले पुन्हा टवटवीत दिसतात.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

loading image