झेंडू उत्पादकांची दिवाळी गोड; दसऱ्यापेक्षा तिप्पट दराने फुलांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flower producers

मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या झेंडूची विक्री करण्या अगोदर एकंदरीत मागणी व पुरवठ्याचा अभ्यास केला नाही अन् इथेच शेतकरी फसले, मात्र दिवाळीत हे स्थिती बदलली..

झेंडू उत्पादकांची दिवाळी गोड; दसऱ्यापेक्षा तिप्पट दराने फुलांची विक्री

sakal_logo
By
भाऊसाहेब गोसावी

नाशिक/चांदवड : शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही असं नेहमीच म्हटलं जातं. पण दस-याला केलेली चूक झेंडू उत्पादक दिवाळीला करणार नाहीत. संधीचा फायदा घेत दिवळीत झेंडू फुलांना योग्य तो भाव मिळवताना दिसत आहेत. मात्र झेंडू उत्पादक शेतकरी हा फायदा आणखी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात.

अन् इथेच शेतकरी फसले

दस-याला शेतकऱ्यांना मार्केटचा अंदाज आला नाही. खरं तर यावर्षी झेंडू ची लागवड कमी प्रमाणातच झाली होती. त्यातच सततच्या पावसामुळे काढणीला आलेलं झेंडू ची फुले खराब झाली होती. या गोष्टीचा व्यापारी वर्गाने अभ्यास केला होता. मात्र मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या झेंडूची विक्री करण्या अगोदर एकंदरीत मागणी व पुरवठ्याचा अभ्यास केला नाही अन् इथेच शेतकरी फसले, कमी भावात व्यापाऱ्यांना फुले दिल्याने झालेले नुकसान शेतकऱ्यांनी या वेळी होऊ दिलेले नाही.

दसऱ्याला अंदाज हुकला

दस-याला शेतकऱ्यांनी व्यापा-यांना जागेवर तीस ते चाळीस रुपये प्रति किलो दराने झेंडू फुलांची विक्री केली होती. तीच झेंडू ची फुले दस-या च्या दिवशी दिडशे ते चारशे रुपये प्रति किलो दराने विकली गेली. आता शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी शेतात जागेवर शंभर ते सव्वाशे रुपये प्रति किलो दराने झेंडू फुलांची विक्री केली. मात्र यावेळी शेतकऱ्यांना तिपटीने जास्तीचा फायदा झाला आहे. यावेळी झेंडू उत्पादकांनी दस-यापेक्षा तिप्पट दराने झेंडूच्या फुलांची विक्री केली.

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

तर नक्कीच जास्त फायदा...

दस-याला मिळालेल्या भावापेक्षा जास्त भाव मिळाला असला तरी शेतकऱ्यांनी स्वत: बाजारात हातविक्रीने फुले विकली तर नक्कीच याहून जास्त फायदा होईल. यातून शेतकऱ्यांनी धडा घ्यायला हवा. आपण पिकविलेला शेतमाल विकताना एकतर स्वतः त्याची विक्री करायला हवी नाहीतर जागेवर विक्री करताना घाई न करता मार्केटचा अंदाज घेऊनच विक्री करायला हवी.

 हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

मी वीस गुंठ्यांत झेंडू ची लागवड केली आहे. दस-याला तिनशे कॅरेट फुलांची विक्री केली त्यावेळी एक लाख दहा हजार रुपये मिळाले.तेवढ्याच फुलांची आता विक्री केली असता तीन लाख रुपये मिळाले.
 - शिवाजी मोरे , प्रगतीशील शेतकरी, देणेवाडी ता.चांदवड
 

loading image
go to top