Nashik News: विजेच्या चपळाईने सागरी मार्कोस कमांडोची हरिहर गडावर चढाई!

Marine Marcos Commando present at Harihar Fort
Marine Marcos Commando present at Harihar Fortesakal

घोटी : मुंबई उरण येथून आलेल्या सागरी मार्कोस कमांडोनी त्र्यंबकेश्वर येथील हरिहर गड चित्याच्या चपळाईन एका तासापेक्षाही कमी वेळात सर केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत गडावर काही काळ घालवून गडाचा इतिहास समजून घेतला. (Marine Marcos commandos attack Harihar Fort with lightning agility Nashik News)

मुंबई उरण येथून रविवारी (ता. १५) सकाळी सातला सागरी मार्कोस कामंडो अधिकाऱ्यांचा एक जथा कोटमवाडीत उतरला. गावातील युवकांकडून गडावर जाण्याची माहिती घेत गावातूनच विजेच्या चपळाईने एका तासांच्या आत गडाच्या शेवटच्या टोकाला पोहोचले.

तेथे गडाची माती कपाळी लावत सैनिकांनी ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा दिल्या. आपला दिनक्रम काही काळ येथे घालवत गडावरील माहिती समजून घेतली.

विशेष म्हणजे यातील सर्व कमांडो अनेक युद्धात सहभागी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. निवृत्तीनंतर युवकांना देशसेवेसाठी ते आजही सज्ज करीत आहेत.

सह्याद्रीच्या निर्भिड दर्याखोऱ्यातील नयनरम्य परिसर आणि नैसर्गिक गडाची छत्रपती महाराजांनी केलेली निवड, युद्धात आखलेले डावपेच, गडाचा सुळका, त्यावरून उंचीवर पाण्याची सैनिकांसाठी केलेली सोय, धान्य कोठार, भुयारी मार्गांची इंत्यभूत माहिती घेत शिवरायांचे महाप्रतापी रूप ते खासगी वहीत टिपण केले.

Marine Marcos Commando present at Harihar Fort
Success Story : 14 वर्षांच्या रियाचे 11 देशांत जादूचे प्रयोग

गडावरील खोऱ्यात गुंजणाऱ्या विविध पक्षांचा किलबिलाट व नैसर्गिक वातावरणाचा आनंद त्यांनी घेतला. वरिष्ठ कमांडो रवीद्र कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत राज्यातील व राज्याबाहेरील २१० दुर्ग सर केले आहेत.

दरम्यान, मरीन मार्कोस कमांडो हरीश चौबे, बिजेंद्र सिंग, मंजित सिंग, राम दावा, सज्जन सिंग, राम स्वार, अनिल नाठे, मोहन लकडा निवृत्त सागरी मार्कोस कमांडो उपस्थित होते.

"छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्यप्रति भूमिका हमे निभाणी है. उन्हे समजना, पढना और उनके स्वराज्य के प्रतिलायक युवक तयार करना हमारा मक्सद है. बहुत खुशी हुवी आज यहा आकार."-हरीश चौबे, निवृत्त सागरी मार्कोस कमांडो, नाशिक

"शिवाजी महाराज के चरणों की धूल मेरे माथे पर लगी और मैं धन्य बन हो गया. जीवनमें आर-पार की लडाई लढी. रिटायरमेंट के बाद सेना में शामिल होना और देश में कानून व्यवस्था बनाए रखना हर साँस तक करना है."-रवींद्र कुलकर्णी, सागरी मार्कोस कमांडो, मुंबई

Marine Marcos Commando present at Harihar Fort
Success Story : सेवानिवृत्त दाम्पत्यानं 70 एकरात कातळावर फुलवली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; राजापुरात पहिलाच प्रयोग, तब्बल 3 लाखांचं उत्पन्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com