Market Committee Election Result: महाविकास आघाडीचा झंझावात, भुसेंना धक्का!

जिल्ह्यात भाजप- शिंदे गट निष्प्रभ
Dada Bhuse vs Advay Hirey
Dada Bhuse vs Advay Hireyesakal

- पालकमंत्री दादा भुसेंना होमपीचवर धक्का
- माजी आमदार अनिल कदम व यतीन कदम भिडले
- चांदवडमध्ये भाजपची सत्ता उलथवत कोतवालांनी घडविले परिवर्तन
- येवल्यात भुजबळ तर पिंपळगांवमध्ये दिलीप बनकरांची सरशी
- लासलगावमध्ये थोरे भुजबळांना पडले भारी
- नाशिकमध्ये देविदास पिंगळेंनी राखला गड


विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Market Committee Election Result
: आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचा झंझावात राहिला आहे. भाजप आणि शिंदे गटाने बाजार समित्यांमध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची जादू चालली नाही. मालेगावमध्ये शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. तेथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलने पालकमंत्री भुसे यांची सत्ता उलथून लावली आहे. (Market Committee Election Result Mahavikas Aghadi shock dada bhuse bjp shinde sena bounce back nashik political news)

येवल्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सरशी झाली असली तरी, लासलगावमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंढरीनाथ थोरे भुजबळ यांना भारी पडले आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी आपला गड कायम राखला आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार अनिल कदम यांना तेथे पराभव पत्करावा लागला. अनिल कदम व भाजपचे युवानेते यतीन कदम हे चुलत बंधू परस्परांमध्ये भिडल्याने जोरदार राडा झाला. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने परिवर्तन घडविले असून,

भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगळे यांनी आपला गड कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

जिल्हयात शनिवारी (ता.२९) नाशिक, पिंपळगाव बसवंत, मालेगाव, लासलगाव, येवला आणि चांदवड या बाजार समित्यांसाठी मतमोजणी पार पडली. यात अनेक धक्कादायक निकाल आले आहेत. जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत डॉ. अद्वय हिरे गटाची सरशी झाली असून, पालकमंत्री भुसे गटाला धक्का दिला आहे.

तेथे १५ पैकी १४ जागांवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी पॅनलने घेत, गत २० वर्षांपासून बाजार समितीवर असलेली भुसे यांची एकहाती सत्ता उलथून लावली आहे.

छगन भुजबळ यांना प्रतिष्ठेची असलेली येवला बाजार समितीत एका हाती सत्ता मिळवली आहे. येथे आमदार नरेंद्र दराडे -माणिकराव शिंदे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. १८ पैकी १५ जागांवर भुजबळ गटाने विजय मिळवला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dada Bhuse vs Advay Hirey
Market Committee Election Result: कळवणला शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व! 18 पैकी 15 जागा जिंकत सत्ता अबाधित

बनकरांची सत्ता कायम

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर यांनी २३ वर्षानंतरही सत्ता कायम राखली आहे. आमदार बनकर यांची सत्ता उलथविण्यासाठी दिग्गज नेत्यांची मोट बांधून माजी आमदार अनिल कदम, गोकूळ गिते यांनी प्रयत्न केले.

मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. येथे अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी प्रस्थापितांना दे धक्का देत बाजार समितीत प्रवेश केला. आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले.

येथे मतमोजणी सुरू असताना माजी आमदार अनिल कदम व भाजपचे नेते यतीन कदम हे चुलत बंधू परस्परांमध्ये भिडले. यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.

राष्ट्रवादीतील फूट भोवली

येवल्यात भुजबळ यांची सरशी झालेली असली तरी, त्यांच्याच मतदारसंघातील कांद्यांचे आगर असलेल्या लासलगावमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. येथे राष्ट्रवादीचेच थोरे यांनी वेगळी चूल मांडत भाजपासह सर्वपक्षीय पॅनल रिंगणात उतरविले होते.

या पॅनलने १८ पैकी ९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. होळकर यांच्या पॅनलला ८ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे येथील सत्तेची चावी अपक्षाच्या हाती असणार आहे.

चांदवडमध्ये भाजपचे माजी सभापती डॉ. कुंभार्डे यांची एकहाती सत्ता उलथविण्यात काँग्रेस माजी आमदार कोतवाल यांना यश मिळाले आहे. कोतवाल यांनी महाविकास आघाडीची पॅनलच्या माध्यमातून वज्रमूठ बांधली होती. मतदारांना त्यांना कौल दिला आहे. येथे १८ पैकी १० जागांवर त्यांना विजय प्राप्त केला आहे.

Dada Bhuse vs Advay Hirey
Market Committee Election Result: देवळा बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता!

देविदास पिंगळेंचा करिष्मा कायम

वर्षभरापासून चर्चेत असलेल्या नाशिक बाजार समितीतील सत्ता खेचण्यासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी शिंदे गट आणि भाजपला सोबत घेत माजी खासदार पिंगळे यांच्यासमोर आव्हान दिले होते.

येथे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना धमकी दिल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय झाली होती. अगदी मतदारांची पळवापळव करत त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्यामुळे निवडणुकीचा गाजावाजा झाला होता.

या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर पिंगळे गटाने १२ (यापूर्वी ३ जागा बिनविरोध व ९ जागा जिंकत) बाजी मारत आपला करिष्मा कायम ठेवला आहे. चुंभळे गटाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मतमोजणी दरम्यान गोंधळ

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत फेर मतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाले. यावेळी माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर झाली.

त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नांदगावची आज मतमोजणी

नांदगाव, मनमाड बाजार समितीची रविवारी (ता.३०) मतमोजणी होत आहे. मनमाड बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार असून सोमवारी (ता.१) त्याची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आता लक्ष लागले आहे

Dada Bhuse vs Advay Hirey
Ghoti Market Committee Election Result : घोटीत शेतकरी विकास पॅनलची सत्ता! परिवर्तन पॅनलला 2 जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com