Fire Damge: औताळे शिवारात टॉमेटो कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग; हजारो कॅरेट जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Massive fire at tomato carat godown

Fire Damge: औताळे शिवारात टॉमेटो कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग; हजारो कॅरेट जळून खाक

वणी (नाशिक) : औताळे, ता. दिंडोरी शिवारातील टोमॅटो व्यापारी शितलदास यांच्या टोमॅटो गोडावूनला आग लागून हजारो टोमॅटो कॅरेट आगीत भस्मसात झाल्याचे कळते, यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी लाखाेंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहॆ. (Massive fire at tomato carat godowns in autale at wani area Burn thousands of carats Nashik News)

हेही वाचा: Nashik : शिवारपाडाच्या राऊत कुटूंबात 7 जणांना अन्नातून विषबाधा

दरम्यान आग विझविण्यासाठी पिंपळगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात येवून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. तत्पूर्वी स्थानिकांनी पाण्याच्या बादल्या भरुन आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने उग्ररुप धारण केल्याने आग विझवण्याचा स्थानिकांचा प्रयत्न तटपुंजा ठरला.

हेही वाचा: Nashik Crime News : उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला