Nashik News: आदिवासी भागात माता मृत्यूचा दर घटला! प्रमाण ५७ टक्यांवरून २४ टक्क्यांपर्यंत खाली; तीन वर्षांत ३६ मातांचा मृत्यू

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधील माता मृत्यूच्या दरात घट होत आहे. २०२१-२२ मध्ये माता मृत्यूचे प्रमाण ५७ टक्के होते.
Nashik News
Nashik NewsEsakal

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधील माता मृत्यूच्या दरात घट होत आहे. २०२१-२२ मध्ये माता मृत्यूचे प्रमाण ५७ टक्के होते. मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण २४ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ आदिवासी तालुक्यांत गेल्या तीन वर्षांत ८९ हजार ३९२ गर्भवतींची प्रसूती झाली असून, यात विविध कारणांनी ३६ मातांचा मृत्यू झाला आहे.

माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले असले तरी, हे माता मृत्यू शून्यावर आणण्याचे ध्येय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या गाभा समितीच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. साधारण आदिवासी तालुक्यांमध्ये पंधरा- वीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी घरीच दाईच्या मदतीने केली जात होती.

त्यामुळे प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. शिवाय, गर्भवतींची नियमित तपासणी किंवा आरोग्याची निगा राखली जात नसल्याचे कारण देखील यामागे होते. सरकारच्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होऊन वेळात उपचार मिळत आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. परिणामी माता मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.

Nashik News
Solapur Lok Sabha: प्रणिती शिंदेंच्या नावे 'इतक्या' कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

अशी केली अंमलबजावणी

अतिजोखीम मातांवर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत विशेष लक्ष

मातेचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार मिळण्यासाठी प्रयत्न

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत महिलांना १५० दिवसांत एक हजार, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार आणि प्रसूतीनंतर दोन हजार रुपये देण्याच्या योजनेची काटेकोर अंमलबजावणी

गर्भवतींची नोंदणी आरोग्य केंद्रात बंधनकारक करून सोनोग्राफी करण्यावर भर

दरमहा नऊ तारखेला पंतप्रधान सुरक्षित मातृत्व मोहिमेअंतर्गत गर्भवतींची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी बंधनकारक

Nashik News
Viral Video: आधी लगीन लोकशाहीचं... विवाहाच्या अवघे काही तास आधी तरुण पोहचला मतदान केंद्रावर

आरोग्य विभागाच्या उपाययोजना

आदिवासी तालुक्यांमधील वाढत्या माता मृत्यूचा अभ्यास केला असता प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव, गर्भार काळातील उच्च रक्तदाब, रक्तक्षय या कारणांनी मातांचा मृत्यू होत असल्याचे निर्दशनास आले. आरोग्य विभागाने माता मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली. यात मातांचा मृत्यू नेमके कोणत्या कारणांनी याचा शोध घेतला.

आदिवासी तालुक्यात माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मोहीम सुरू आहे. माता मृत्यूचा हा दर शून्य करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.

- डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

Nashik News
Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' वक्तव्याची दखल, दिले चौकशीचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com