जुने नाशिक- मेट्रोमोनी ऑनलाइन संकेतस्थळावरून तरुणींना, तसेच विधवा, घटस्फोटित तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पितापुत्रास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. तीन प्रकरणे उघडकीस आली असून, त्यात संशयितांनी सुमारे अडीच कोटींची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.