MBA CET Result 2023 : एमबीए सीईटीचा आज निकाल | MBA CET Result Today 3 june nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mba cet exam result 2023

MBA CET Result 2023 : एमबीए सीईटीचा आज निकाल

MBA CET Result 2023 : व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या ‘एमबीए’ च्‍या सीईटीच्‍या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती.

सीईटी सेलतर्फे निकालाच्‍या तारखेची घोषणा केली असून, शनिवारी (ता.३) सायंकाळी पाचला निकाल जाहीर केला जाणार आहे. (MBA CET Result Today 3 june nashik news)

सीईटी सेलतर्फे एमबीए अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेदरम्‍यान राज्‍यभरातील अनेक केंद्रांवर तांत्रिक त्रूटी आल्‍याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकाराची दखल घेतांना तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्‍या विद्यार्थ्यांची पुन्‍हा परीक्षा घेण्यात आलेली होती.

बहुतांश व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचा निकाल लागलेला असतांना, विद्यार्थ्यांना परीक्षेच्‍या निकालाची प्रतीक्षा लागून होती. यासंदर्भात सीईटी सेलने सूचनापत्र जारी करतांना शनिवारी (ता.३) निकाल जाहीर केला जाणार आहे.