MBBS admissions
sakal
नाशिक: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी तिसरी फेरी राबविण्यापूर्वी नोंदणीची संधी दिली जाणार आहे. त्यानुसार नीट परीक्षा दिलेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यासाठी सोमवार (ता.६) पासून संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. दरम्यान, तिसऱ्या फेरीची निवड यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.