esakal | हॉटेलचालकांना महागाईचा चटका! जेवणाचे दर वाढणार..?
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel

हॉटेलचालकांना महागाईचा चटका! जेवणाचे दर वाढणार...

sakal_logo
By
एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनातून (Corona) सावरत अखेर पिंपळगाव शहरातली हॉटेल, ढाबे, खानावळी सुरू झाल्या पण त्याचबरोबर त्यांना महागाईची झळही बसू लागली आहे. खाद्यतेलापासून गॅस सिलिंडरपर्यंत आणि कांद्यापासून अंड्यापर्यत सर्वच वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहेत. या स्थितीत थाळीची दरवाढ करावी, असा बहुतांश हॉटेल मालकांचा प्रस्ताव आहे. परंतु महागाईचा हा थाळीनाद करताना व्यवसाय पूर्वपदावर आलेला नाही त्यामुळे दरवाढ केली तर खवय्ये पाठ फिरवतील अशी भिती आहे. दरम्यान किराणा साहित्य महागल्याने सरासरी दहा ते वीस टक्क्यांनी दरवाढ केली जाण्याचे संकेत मिळत आहे.

भाववाढ केल्यास ग्राहक दुरावण्याची भीती

खाद्यतेलाच्या दरात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरचे दर दीड हजारांवर पोचले आहेत. मटण, चिकन, अंडी, कोळसा, मैदा, तांदूळ, दाळ सारेच महागले आहेत. पिंपळगाव शहरातील व महामार्गावरील सुमारे ५० हॉटेल, ढाबे सुरू आहे, पण अपेक्षित प्रतिसाद नाही. टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकरी हॉटेलच्या खर्चाला कात्री लावत आहे. अशात जेवणाचे दर वाढविले तर आहे ते ग्राहकही पाठ फिरवतील अशी भिती हॉटेल चालकांना आहे. काही हॉटेलमध्ये दरवाढ झाली आहे. थाळीमागे 20 ते 50 रुपये वाढवण्यात आले आहे. दरवाढीचे स्टिकर लावण्यात आले आहे. पण तेथे ग्राहकांवर परिणाम झालेला दिसतो. महागाईचा थाळीनाद होऊन दरवाढ करण्यास इतर हॉटेल चालक कचरत आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंद

दरवाढीचा भडका...

गॅस सिलिंडर (व्यावसायिक) -1600 रूपये, खाद्यतेल (15 लिटर) -2400 रूपये, तांदूळ - 30 टक्क्यांनी वाढ, कोळसा - 660 रूपये (25 किलो)

''शाकाहारी, मांसाहारी जेवणाची दरवाढ करणे आवश्‍यकच आहे, मात्र आमचे धाडस होईना. अगोदरच ग्राहक नाहीत. काहीनी दरवाढ केली तर तेथे ग्राहकांची संख्या रोडवली आहे.'' - सरबजीत पामा (हॉटेल भोले-पंजाब)

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

loading image
go to top