Civil Hospital & ZP nashik
Civil Hospital & ZP nashikesakal

Nashik: महिना उलटूनही वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी होईना! जिल्हा परिषद आरोग्य- जिल्हा रूग्णालयाची टोलवाटोलवी

Nashik News : महिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्यांपूर्वी रातोरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात दाखल झालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत मोठी ओरड झाली.

त्यावर या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात येतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले. मात्र, महिना होऊनही वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या पडताळणीला मुहूर्त लागलेला नाही.

सुरवातीला जिल्हा रुग्णालयाने प्रस्ताव मिळाले नसल्याचे सांगत हात वर केले होते. यावर पाठपुरावा झाल्यानंतर प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन दिवसात पडताळणी केली जाईल, असे सांगण्यात आले. (Medical certificate not verified after month Zilla Parishad Arogya vibhag civil District Hospital ignorance nashik news)

गत महिन्यात जिल्हा परिषदेच्या नियमित बदली प्रक्रीया पार पडली. यात आरोग्य विभागाची बदली प्रक्रीया होण्यापूर्वी रातोरात आरोग्य विभागातील ठराविक अधिकाऱ्यांनी ९ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करत त्यांचे आदेशदेखील निर्गमित केले.

विविध आजारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र या बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जोडले होते. या कर्मचाऱ्यांना नाशिक तालुक्यातच पदस्थापना देण्यात आली होती. यात खोटे घटस्फोट, विधवा प्रमाणपत्र जोडत काही कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात बदली करून घेतली.

मात्र, या बदल्यांवर आरोग्य विभागातील कर्मचारी, परिचर संघटनांनी आक्षेप घेतले. खोटी व आर्थिक देवाणघेवाण घेऊन या बदल्या झाल्याचा आरोप नर्सेस संघटनेने करत थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दखल घेतली ही प्रकरणे पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये काही आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Civil Hospital & ZP nashik
Telangana Onion Rate: BRS नेत्यांच्या दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल! कांदा लिलाव व दराची मांडली कैफियत

त्यावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांनी तातडीने या बदल्यांमधील वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल, असे सांगत प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पाठपुरावा केला असता, प्रस्ताव पाठविले असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्यक्षात जिल्हा रूग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली असता जिल्हा आरोग्य विभागाकडून पडताळणीचे प्रस्ताव मिळाले नसल्याचे सोमवारी सकाळी सांगण्यात येऊ लागले.

मात्र, डॉ. नेहते यांनी प्रस्ताव पाठविले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रस्तावांबाबत संभ्रम निर्माण झाला.

अखेर सायंकाळी उशिराने जिल्हा रुग्णालयाने प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचे सांगत, त्यावर कार्यवाही झाली नसली तर येत्या दोन दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

Civil Hospital & ZP nashik
Ashadhi Ekadashi Bakri Eid: ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान' आषाढी-बकरी ईदचे जपले धार्मिक पावित्र्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com