Thieves broke a hole and entered the medical shop.
Thieves broke a hole and entered the medical shop.esakal

Nashik Crime : येवल्यात भरचौकात मेडिकल दुकान फोडले; 57 हजारांवर डल्ला

येवला (जि. नाशिक) : शहरात विंचूर चौफुली येथील गणेश मेडिकल हे दुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह ५७ हजारांवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी ५५ हजार रुपये रोकडसह दोन हजारांचे कंडोमचे बॉक्सही चोरून नेले आहेत. (medical shop robbed in Yeola 57 thousand stolen Nashik Latest Crime News)

ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोमवारी (ता. १२) मध्यरात्री एकच्या सुमारास हाकेच्या अंतरावर असलेल्या विंचूर चौफुली येथील पोलिस चौकीसमोरील गणेश मेडिकल हे दुकान चोरट्यांनी छताला मोठा बोगदा पाडून दुकानात प्रवेश केला.

दुकानाच्या गल्ल्यातील शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस बँक बंद असल्याने जमा झालेली अंदाजे ५५ हजारांची रोकड, ६०० रुपयांचे चॉकलेट बॉक्स व चार कंडोमचे बॉक्स आणि इतर असा मुद्देमाल लांबविला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व रात्रीही वर्दळ असताना दुकान फोडल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यातच विठ्ठलनगर येथे तीन ठिकाणी चोरी झाली होती.

Thieves broke a hole and entered the medical shop.
नियतीने हिरावलेल्या मित्राच्या मदतीसाठी सरसावले ठेकेदार मित्रांचे हात!

विंचूर चौफुली वर्दळीचा भाग असून येथे सर्व व्यापारी दुकाने आहेत. या चोरीमुळे इतर व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. मागील बाजूने चोरट्याने भिंतीला बोगदा पाडून आत प्रवेश केल्याने चोरट्याच्या हा फंडाही कुतूहलाचा विषय बनला आहे.

दरम्यान, विंचूर चौफुली येथील हायमास्ट, सीसीटीव्ही बऱ्याच दिवसापासून बंद असल्यामुळे असल्यामुळे परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे हायमास्ट, सीसीटीव्ही यंत्रणात चालू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या घटनेने व्यापारी वर्गात भीतीची वातावरण आहे. शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे, राजेंद्र पाटील, गेठे, बागूल घटनास्थळी पाहणी करून पथक तयार करून या चोरीचा शोध सुरू केला आहे.

Thieves broke a hole and entered the medical shop.
Rain Updates : दिंडोरीत पावसाने ओलांडली सरासरी; सर्व धरणे 90 टक्क्यांच्या वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com