esakal | मालेगावात आता वैद्यकीय अधिक्षकांची उचलबांगडी.. कोरोनाच्या उद्रेकामुळे बदली सत्र सुरूच..
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon civil hospital.png

डॉ. डांगे यांच्या कार्यपध्दतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. येथील मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था व सामान्य रूग्णालयातील रिक्तपदे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 2015 ला जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार लोकप्रितिनिधी व अधिकारी यांची समिती गठीत करून कार्यवाही व सुधारणा सुरू होत्या. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

मालेगावात आता वैद्यकीय अधिक्षकांची उचलबांगडी.. कोरोनाच्या उद्रेकामुळे बदली सत्र सुरूच..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाच्या उद्रेकमुळे शहर हादरले आहे. संसर्गाचा अटकाव करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून वरिष्ठ अधिकारींचे बदली सत्र सुरूच आहे. येथील सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक म्हणून नाशिक संदर्भ सेवा रूग्णालयाचे वेद्यकीय अधिक्षक डॉ. प्रल्हाद गुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालेगाव सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक बदली
येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे यांची चोपडा ग्रामीण रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. डांगे यांना येथे तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला होता. त्यांच्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधिंच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. कोरोना संसर्ग काळात आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल व त्यांच्यात सामान्य रूग्णालयात झालेला गोंधळ राज्यात चर्चेचा ठरला होता. या प्रकरणी आमदार मौलाना मुफ्तींसह संशयीतांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

कार्यपध्दतीविषयी अनेकांची नाराजी
डॉ. डांगे यांच्या कार्यपध्दतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. येथील मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था व सामान्य रूग्णालयातील रिक्तपदे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 2015 ला जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार लोकप्रितिनिधी व अधिकारी यांची समिती गठीत करून कार्यवाही व सुधारणा सुरू होत्या. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

loading image
go to top