मेडिकल कचरा ठरतोय कोरोना स्प्रेडर्स; पैसे वाचविण्यासाठी घंटागाडीतून वाहतूक

घंटागाडीत मेडिकल वेस्ट टाकले जात असल्याने कोरोना सुपर स्प्रेडर्स ठरताना दिसत आहे
medical waste
medical wasteSYSTEM

नाशिक : शहरात रुग्णालयातून तयार होणारा वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) संकलित करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करण्याची व्यवस्था असतानाही कोविड रुग्णालयाकडून घरातून संकलित केल्या जाणारा कचरा घंटागाडीत मेडिकल वेस्ट टाकले जात असल्याने कोरोना सुपर स्प्रेडर्स ठरताना दिसत आहे. घंटागाडी संपूर्ण विभाग फिरून शेवटी कचरा डेपोत पोहचते. या चार ते पाच तासांच्या कालावधीत लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सारेच घंटागाडीच्या संपर्कात येतात. त्यामुळे घंटागाडीतून संकलित होणारे बायो मेडिकल वेस्टदेखील कोरोना स्प्रेडर्ससाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात घनकचरा संकलित करण्यासाठी घंटागाडींची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा विभागात १६५ घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. शहरातून दररोज पाचशे ते ५५० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. घंटागाडीच्या माध्यमातून कचरा डेपोत कचरा संकलित होऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. घनकचरा प्रमाणेच रुग्णालयातील वैद्यकीय कचरा अर्थात बायोमेडिकल वेस्ट कचरा संकलित करण्याची व्यवस्था आहे. बायोमेडिकल वेस्टमध्ये सुई, वापरात आलेली औषधे, सलाईन, वापरलेल्या बाटल्या आदींचा समावेश आहे. विभागनिहाय स्वतंत्र घंटागाडीच्या माध्यमातून बायोमेडिकल वेस्ट संकलित करून कन्नमवार पुलाजवळील प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी किलो प्रमाणे रुग्णालयाकडून पैसे आकारले जातात. कोविडमुळे गेल्या वर्षभरापासून रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट बाहेर पडत आहे.

medical waste
लग्नाचा बार उडाला पण संपूर्ण वऱ्हाडी मंडळी संकटात!
Medical Waste
Medical WasteSYSTEM

तीन-चार टन प्रतिदिन बायोमेडिकल वेस्ट

जानेवारीपर्यंत साधारण एक टन, तर फेब्रुवारी ते १८ एप्रिल या कालावधीत तीन ते चार टन प्रतिदिन बायोमेडिकल वेस्ट बाहेर पडत आहे. बायोमेडिकल वेस्ट संकलित करण्यासाठी वाहनाची व्यवस्था असतानादेखील घंटागाडीत टाकले जाते. त्यातून कोरोना स्प्रेडर्स ठरत आहे. रुग्णालयाकडून पैसे वाचविण्याची ही शक्कल लढविण्यात आली असली तरी घंटागाडी कामगारांसह नागरिक बाधित झाल्यास लाखो रुपयांची रुग्णालयांची बिले अदा करावी लागत असल्याने त्यासाठी तर आटापिटा नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोविड सेंटरचा कचरा रस्त्यावर

महापालिकेसह सामाजिक संस्थांनी कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. कोविड सेंटरमध्येदेखील मेडिकल वेस्ट संकलनाची व्यवस्था आहे. मात्र रस्त्यावरच कचरा फेकला जात आहे. ठक्कर डोम येथील कोविड सेंटरचा प्रकार समोर आला आहे. मेडिकल वेस्ट गाडीत कचरा न टाकता बाहेर कचरा फेकून कोरोना स्प्रेडर्स ठरत आहेत.

medical waste
सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com