Meeting with CM : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11ला नाशिकच्या प्रश्नासंदर्भात बैठक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting with CM

Meeting with CM : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11ला नाशिकच्या प्रश्नासंदर्भात बैठक!

नाशिक : नोकर भरतीसह नाशिक महापालिका संदर्भातील प्रश्नांसंदर्भात येत्या बुधवारी (ता. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. (Meeting regarding Nashik issue on 11th january in presence of Chief Minister eknath shinde nashik nmc news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच महापालिकांचे आयुक्त व अ वर्ग नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद बोलावली आहे. शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याबरोबरच शहरात संदर्भात शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.

नाशिक महापालिकेकडून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नाशिक संदर्भातील प्रश्न मांडणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत लांडगे यांनी महापालिकेला तसे पत्र सादर केले आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : अपुऱ्या व्यवस्था अभावी महिला वर्गाची कुंचबणा; देवळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव

बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना प्रश्नांचा अभ्यास होण्यासाठी नोकर भरती प्रक्रिया संदर्भात केलेली कारवाई, शहर सौंदर्य करण्यासाठी उचललेली पावले, रुग्णालय व शाळांच्या अद्ययावत करण्यासाठी केलेले प्रयत्न,

महापालिकांच्या उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, तसेच केंद्रशासन पुरस्कृत आवास योजना व निधी अमृत दोन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान संदर्भात केलेली कारवाई यासंदर्भात आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेत चर्चा होणार आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का!