Nashik News : वटवाघळांचा उपद्रव टाळण्यासाठी बोरींच्या झाडाला जाळीचे आच्छादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mesh cover applied to Bori tree to prevent bat infestation nashik news

Nashik News : वटवाघळांचा उपद्रव टाळण्यासाठी बोरींच्या झाडाला जाळीचे आच्छादन

बिजोरसे (जि. नाशिक) : बोरांचा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण शेतकरी (Farmer) हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात देखील नवनवीन प्रयोग करताना कसमादे पट्ट्यात पाहायला मिळत आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲपल बोर लागवड झाली आहे. (mesh cover applied to Bor tree to prevent bat infestation nashik news)

पिकांप्रमाणे फळबागांनाही पशुपक्षांचा उपद्रव जाणवू लागला आहे. बोरीला वटवाघूळ पक्षांचा उपद्रव असल्याने त्यावर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी बोरींच्या झाडाला जाळीचे आच्छादन टाकले आहे.

वटवाघूळ पूर्ण बोर न खाता अर्धे खाऊन फेकून देतात. झाडावर बसल्यानंतर पिकलेले बोर जमिनीवर पडते व माती लागून ते खराब होते. या परिस्थितीला शेतकरी कंटाळले म्हणून प्लॅस्टिकची जाळी आता शेतकरी वापरू लागला आहे. प्रत्येक झाडावर जाळू टाकून मंडपाप्रमाणे बोरीच्या झाडाचे संरक्षण केले जात आहे. यामुळे पक्षी बोर खात नाही.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

जाळी टाकल्याशिवाय बोरीच्या झाडाचे संरक्षण होत नाही. जाळी टाकली नाही तर निम्म्याहून अधिक बोरे पक्षी खाऊन जातात. २० टक्के बोर खाली पडतात. अवघे ३० टक्के उत्पादन मिळते. त्यावर नवीन युक्ती शोधत बोर उत्पादक शेतकऱ्यांनी जाळीचा प्रयोग सुरु केला आहे.

"आज पक्ष्यांना खायला शेतकरी पूर्वी सारखे अन्नधान्य गहु, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नागली, तिळी, मठ, मूग पीक टाकत नसल्यामुळे पक्षी आता डाळिंब, बोर यासह विविध फळ बागांवर जास्त उपद्रव करत आहेत. हातचे पीक जाण्याची शक्यता असल्याने म्हणून असे प्रयोग करावे लागतात." - तुषार निकम, शेतकरी