Metro Project
sakal
नाशिक: शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नाशिक मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र सरकारची भूमिका अजूनही उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्रालयाकडून कोणताही ठोस, कालमर्यादेसह प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकल्पाविषयी अनिश्चितता असल्याचा आरोप खासदार वाजे यांनी केला.