Black Magic
sakal
नाशिक: म्हसरूळ परिसरामध्ये सराफाच्या दुकान व घरासमोर जादूटोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकाराची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सराफ कुटुंबीयांवर वशीकरणासाठी जादूटोणा करणाऱ्या संशयित युवकाला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून, त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.