esakal | कसारा घाट हाऊसफुल्ल! घाटात परप्रांतीयांचे लोंढे..ट्राफिक जाम..
sakal

बोलून बातमी शोधा

kasara ghat jam.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर शेकडो मजूर पायी गावाकडे चालत जात आहेत. काही मजूर रिक्षा, टॅम्पो, दुचाकी किंवा मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत. तर कित्येक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कसारा घाटात पायी चालणाऱ्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांचे नागरिक आहेत. हे मजूर आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन गावाकडे निघाले आहेत.

कसारा घाट हाऊसफुल्ल! घाटात परप्रांतीयांचे लोंढे..ट्राफिक जाम..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. त्यांची प्रचंड गर्दी कसारा घाटात पाहायला मिळत आहे. यापैकी अनेक मजूर पायी चालत जात आहेत. त्यामुळे कसारा घाटात वाहनांची मोठी रांग लागली असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

विविध राज्यांचे नागरिकांना घरी जायची ओढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर शेकडो मजूर पायी गावाकडे चालत जात आहेत. काही मजूर रिक्षा, टॅम्पो, दुचाकी किंवा मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत. तर कित्येक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कसारा घाटात पायी चालणाऱ्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांचे नागरिक आहेत. हे मजूर आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन गावाकडे निघाले आहेत.

हेही वाचा > मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे

लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे, ट्रेन, बसेसची सुविधा सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकार मजुरांना घरी पाठवण्यासाठी नियोजन करत आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई येथून परप्रांतियांसाठी विशेष ट्रेनदेखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

loading image