esakal | आदिवासी विभागात कोरोनाची बाधा; मंत्री के. सी. पाडवी होम क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

KC-Padvi.jpg

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून कोरोनावर मात करून ते कामावर परतले आहेत. त्यात जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब पाटील, उदय सामंत, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आदी मंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे

आदिवासी विभागात कोरोनाची बाधा; मंत्री के. सी. पाडवी होम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून कोरोनावर मात करून ते कामावर परतले आहेत. त्यात जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब पाटील, उदय सामंत, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आदी मंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. यानंतर आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के. सी. पाडवी यांचे स्वीय सहाय्यक तसेच वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पाडवी यांनी नाशिकमध्ये स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. मंत्र्यांच्या संपर्कात आल्याने आदिवासी आयुक्त आणि आदिवासी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (एमडी) यांनीही स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.

नागरिकांनी भेटण्यास न येण्याचे आवाहन

दरम्यान "कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. कोरोनाची लक्षणे नसली तरी, खबरदारी म्हणून नागरिकांना भेटण्यास येऊ नये. तसेच यापूर्वी संपर्कात आलेल्यांनीही काळजी घ्यावी" असे आवाहन आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी केले आहे. मंत्री अ‍ॅड. पाडवी यांचे मुंबईतील दोन स्वीय सहायक करोना पॉझिटिव्ह आल्याने मंत्रालयातील विभागाचे कामकाज ठप्प पडले. तर स्वीय सहायक पॉझिटिव्ह आल्याने अ‍ॅड. पाडवी यांची दोन दिवसांपूर्वी करोनाची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, नंदुरबारहून ज्या वाहनाने अ‍ॅड. पाडवी नाशिकला आले, गाडीचा चालक पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर अ‍ॅड. पाडवी यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले. सध्या कोरोनाची कोणतीही लक्षण नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नागरिकांनी भेटण्यास येऊ नये, आवाहन केले आहे.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

आदिवासी आयुक्तालयातही कोरोनाचा शिरकाव

पाडवी यांच्या मंत्रालयापाठोपाठ आदिवासी आयुक्तालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तेथील दोन जण यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. आता आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे आणि आदिवासी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नितीन पाटील यांनाही ताप, खोकल्याची लक्षणे जाणवू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून सध्या स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. यासोबत विभागातील अनेक अधिकाऱ्यांनीही मंत्र्यांच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटाइन करून घेतले आहे.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

loading image