missing boy ajit
missing boy ajit esakal

Nashik : आस्था निवारागृहातील अल्पवयीन मुलगा बेपत्ता

Published on

जुने नाशिक : ट्रॅक्टर हाऊस परिसरातील आस्था खुले निवारागृहातून (Shelter) रविवारी (ता. ३) अल्पवयीन मुलगा बेपत्ता (Missing) झाला आहे. अजित ( पूर्ण नाव समजू शकले नाही), असे मुलाचे नाव आहे. रस्त्यावर फिरणारे अनाथ मुलांना याठिकाणी ठेवले जाते. (minor boy has gone missing from Astha Shelter Nashik News)

missing boy ajit
नाशिक : वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी फोडली दानपेटी

रविवारी निवारागृहाचे अधीक्षक सागर बोडके निवारागृहातील आठ मुलांना परिसरात खेळावयास घेऊन गेले. खेळून झाल्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वजण निवारागृहात परतले. त्यानंतर कामानिमित्ताने श्री. बोडके बाहेर गेले. रात्री आठच्या सुमारास ते परतले असता, अजित त्यांना आढळून आला नाही. परिसरात शोध घेतला तो मिळून आला नाही. बेपत्ता झाल्याचे लक्षात येतात त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी बंटी सय्यद अधिक तपास करत आहे.

missing boy ajit
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com