esakal | खाकीच्या रुपात धावले देवदूत! चालत्या ट्रेनमध्ये अडकलेल्या वृध्दाला वाचविले; पाहा VIDEO

बोलून बातमी शोधा

nashik road
खाकीच्या रुपात धावले देवदूत! चालत्या ट्रेनमध्ये अडकलेल्या वृध्दाला वाचविले; पाहा VIDEO
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्येही ही घटना समोर आली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. काय घडले नेमके पाहा...

रेल्वे पोलिस आले देवदूत बनून

गोदान एक्स्प्रेसमधून रियाज शेख हा वृद्ध प्रवासी नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्यासाठी उतरला होता. इतक्यात ट्रेन सुटल्याने त्याने धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेनने वेग धरल्यामुळे वृद्ध प्रवाश्याचा पायरीवरुन घसरला. मात्र लोहमार्ग पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवले. चालती ट्रेन पकडण्याच्या नादात पायरीवरुन घसरलेल्या वृद्धाचे प्राण पोलिसांनी वाचवले. प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यामधील पोकळीत अडकलेल्या प्रवाशाला दोघा पोलिसांनी वाचवले.

हेही वाचा: कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात

दोघांवर कौतुकाचा वर्षाव

इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके असे या दोघा पोलिसांचे नाव आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकातील ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रियाज शेख यांचा जीव वाचवणारे लोहमार्ग पोलीस इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: नवजात चिमुरडा बनला कोरोना योध्दा! स्कोर १२ असूनही यशस्वी मात

मयुर शेळकेचं शौर्य; बचावला अंध आईचा लेक

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.