वाट चुकलेला हितेश आईच्या कुशीत; ब्राह्मणगावच्या युवकांमुळे कुटुंबियांची भेट

Nashik Marathi News
Nashik Marathi News esakal
Updated on

ब्राह्मणगाव : देवळाणे (ता. बागलाण) येथील मुलगा हितेश सुरेश पवार (वय १०) हा पायी चुकून गुरुवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास ब्राह्मणगावी येऊन पोहचला. भेदरलेल्या स्थितीत असलेल्या या मुलाला ब्राह्मणगावातील तरुणांनी बघितले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले. दुपारपासून बेपत्ता असलेल्या मुलाला पाहताच आई- वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला. त्याला छातीशी कवटाळून आनंद व्यक्त केला.


ब्राह्मणगावातील सामाजिक कार्यकर्ते जयदीप अहिरे, रोशन अहिरे, कैलास मालपाणी, बाळ धुमाळ, पप्पू शिरोडे, बापू माळी, परिमल माळी यांना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अनोळखी मुलगा नजरेस पडला. त्याचे हावभाव बघता हा युवक चुकला असल्याचे लक्षात घेता हितेशची विचारपूस केली. भेदरलेल्या अवस्थेत असल्याने त्याला आपण कुठे राहतो, हे देखील सांगता येत नव्हते. भुकेने व्याकुळ झालेल्या या मुलासाठी युवकांनी भोजनाची व्यवस्था केली. हितेशने अगोदर आपण ब्राह्मणगाव येथील एकलव्यनगरमध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यास तेथे नेले, पण ओळख पटली नाही. मग, त्याने अजमेर सौंदाणे येथे माझे मामा राहत असल्याचे सांगितले.

Nashik Marathi News
डिलिव्हरी बॉय असा झाला करोडपती; आता फिरतो 2 कोटींच्या कारमध्ये

त्यानुसार येथील मधूमालती टूर्ल्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक बाळ धुमाळ यांनी त्यांच्या वाहनाने अजमेर सौंदाणे गाठले. तेथे जाऊन त्याच्या मामाची भेट घेऊन हितेश हा त्यांचा भाचा असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर आई- वडिलांना दूरध्वनीवरून निरोप देऊन हितेशला मामाच्या स्वाधीन केले. हितेश दुपारपासून घरात नाही हे लक्षात आल्याने आई- वडील दिवसभर त्याच्या शोधात होते. मात्र, हितेश मामाच्या गावी असल्याचे मामा महेंद्र माळी यांनी कुटुंबियांना कळविले. हरवलेल्या हितेशची आई-वडिलांची भेट घडवून आणत ब्राह्मणगांव येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले.

Nashik Marathi News
Monsoon Session : मी नवीन प्लेअर, संभाळून घ्या; मंगलप्रभात लोढांची विरोधकांना साद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com