esakal | तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे - आमदार पवार
sakal

बोलून बातमी शोधा

MLA nitin pawar

तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे - आमदार पवार

sakal_logo
By
रविंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला असताना ‘डेल्टा' (Delta) विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. कोविडव्यतिरिक्त चिकूनगुनिया, मलेरिया, डेंगी या आजारांबाबतही सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यांतील आरोग्य यंत्रणेला दिल्या.

आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

कळवण प्रकल्पाधिकारी कार्यालयात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्या वेळी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. कोरोना सद्यःस्थिती, लसीकरण, संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत उपाययोजना, कळवण, सुरगाणा तालुक्यांतील शासकीय विभागांच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला. कोविड सेंटरमधील रुग्ण खाटा, औषधे, इंजेक्शनचा साठा, ऑक्सिजन प्लांट यंत्रणा आणि पुरवठा याची खातरजमा करण्याचे निर्देश आमदार पवार यांनी प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिले.

हेही वाचा: नाशिक : 'कोयता गॅंग'ची दिवसाढवळ्या दहशत! नागरिक भयभीत

सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे, सुरगाणा तहसीलदार विजय सूर्यवंशी, मुख्याधिकारी सचिन पटेल, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सुरगाणा पोलिस निरीक्षक कोळी, अभोणा पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, कळवणचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : सराफ व्यावसायिकास मारहाण; दागिन्याची बँग पळवली

loading image
go to top