esakal | नाशिक : 'कोयता गॅंग'ची दिवसाढवळ्या दहशत! पोलिसांसमोर आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

koyta gang

नाशिक : 'कोयता गॅंग'ची दिवसाढवळ्या दहशत! नागरिक भयभीत

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : येथील मुक्तिधाम (Muktidham temple) शेजारी असणाऱ्या बाजारात कोयता गॅंगची (koyta gang) दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या ही कोयता गॅंग वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरून कोयता व तलवारीचा धाक दाखवून पैसे वसूल करीत आहे. यामुळे व्यावसायिक भयभीत झाले असून सर्व व्यापाऱ्यांच्यावतीने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सिद्धार्थ छोटू पहिण्या व तेजस गांगुर्डे अशी संशयितांची नावे आहेत.

मुक्तिधाम मंदिराजवळ कोयता गॅंग ची दहशत

कापड व्यावसायिक लक्ष्मी पांडे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या दुकानात कोयता गॅंग यांचे पाच सदस्य कोयत्याचा धाक दाखवून रोकड आणि कपडे घेऊन गेले. त्यांच्या हातात कोयते असल्यामुळे आम्ही प्रतिकार केला नाही. मात्र महिना- दोन महिने ही कोयता गँग दुचाकी वर येते आणि कोयत्याचा धाक दाखवून रोकड आणि कपडे विकाऊ वस्तू घेऊन पसार होते. अनेक वेळा पोलिस ठाण्याला आम्ही तक्रारी दिल्या, मात्र पोलिस दखल घेत नाहीत. त्यांचा त्रास सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामान्य व्यापाऱ्यांनाही कोयता गॅंग नशा करून धमकावत आहे. नशेत असणारी ही टोळी कोणालाही बाजारात मारझोड करते. शिवाय कोणत्याही दुकानदाराच्या गल्यातील पैसे कोयत्याचा धाक दाखवून पसार होत आहे.

हेही वाचा: यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

पोलिस आयुक्तांना निवेदन देणार

उपनगर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या व लुटणाऱ्या कोयता गॅंगचा बिमोड करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांना भेटून व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

परवा कोयता गॅंग आली आणि दुकानातील कपडे फुकट मागायला लागली. प्रतिकार केला असता त्यांनी मारहाण केली. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांना पुरावे दिले आहेत. - इम्रान शेख, दुकानदार

कोयते घेऊन ही टोळी कधीही येते आणि पैसे मागते, महिलांना धमकावते. पोलिसांना अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र त्याची गंभीर दखल अजूनही घेतली गेलेली नाही. या संदर्भात आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहोत. - लक्ष्मी गांगुर्डे, कपडे व्यावसायिक

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

loading image
go to top