सत्तांतरानंतर मनसेचा ॲक्शन मोड; नांदगावकरांचा संवाद पॅटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS

सत्तांतरानंतर मनसेचा ॲक्शन मोड; नांदगावकरांचा संवाद पॅटर्न

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील ॲक्शन मोडमध्ये आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (NMC elecion) मोर्चे बांधणीसाठी पक्षाच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) एकेकाळी नाशिक हा गड होता. तीन आमदार, महापालिकेची सत्ता, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सदस्य अशी मनसेची ताकद होती. परंतु २०१४ नंतर भाजपची लाट सुरू झाल्यानंतर मनसेची ताकद अगदी क्षीण झाली. (MNS action mode Bala Nandgaonkar will speak with mnsainik mharashtra politics News)

सत्तेच्या राजकारणाचा विचार करता मनसेची ताकद फारशी नसली तरी संघटना म्हणून आजही मनसेचा विचार होतो. गेल्या आठ दिवसापासून सत्तेच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये मनसेचे महत्त्व अचानक अधोरेखित झाले. त्यामुळे पक्षांमध्ये ‘जान' आली. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला जवळ करत मशिदीवरील भोंगे हटविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पक्षाला हिंदुत्वाचा बूस्टर डोस मिळाला. परंतु आता एक आमदार असला तरी सत्तेच्या राजकारणात महत्त्व असतेच ही बाब मनसेच्या लक्षात आली आहे. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर सध्या सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता मनसे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर शनिवारी (ता. २) नाशिकमध्ये येत असून, सांयकाळी पाच वाजता ते संवाद साधणार आहे.

नांदगावकर यांच्यासह अनिल शिदोरे व पक्षाचे सरचिटणीस संजय नाईक यांची संपर्क नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अद्याप नांदगावकर यांनी नाशिकचा दौरा केला नव्हता. संपर्क नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नांदगावकर यांचा हा पहिलाच दौरा असल्याने दौऱ्याची जोरदार तयारी मनसैनिकांनी केली आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तसेच संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने नांदगावकर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याबद्दल उत्सुकता आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले यांनी केले आहे.

हेही वाचा: Nashik : बांधकाम परवानगीसाठी आजपासून आभासी प्रणाली

‘वन टू वन’ समस्या जाणून घेणार

मनसेकडे कार्यकर्त्यांची मोठे बळ असल्याने त्या बळाच्या आधारे महापालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु, तरुण तडफदार कार्यकर्त्यांमध्येदेखील पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी आहे. या कुरबुरी नेमक्या काय आहेत. हे जाणून घेण्यासाठी नांदगावकर पदाधिकारी व निवडक कार्यकर्त्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधणार आहे.

हेही वाचा: पोलीस अधीक्षकांच्या भेटीने, शेतकरी सुखावला

Web Title: Mns Action Mode Bala Nandgaonkar Will Speak With Mnsainik Mharashtra Politics News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top