esakal | हॉटेल ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरू करा; इगतपुरीत मनसेचे निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

MNS

हॉटेल ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरू करा; इगतपुरीत मनसेचे निवेदन

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील हॉटेल ताब्यात घेऊन त्याचा वापर कोविड सेंटरसाठी करावा, या मागणीसाठी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.१९) निवेदन दिले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या व पुढील मोठा धोका लक्षात घेऊन स्थानिकांना नाशिकला न जाता आपल्या तालुक्यातच उपचार मिळावा, यासाठी तालुक्यातील हॉटेल प्रशासनाने त्वरित ताब्यात घेऊन त्याचा वापर कोविड सेंटरसाठी करावा, अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तसेच कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस व इतर कामगार अपुरे पडत आहेत. नवीन भरती तत्काळ करावी, लसीकरणाचा वेग वाढवून लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे. कोविड महामारीत सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलिस, शिक्षक, आशासेविका व इतर त्यासंबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपये विमाकवच सरकारकडून द्यावे, कोरोना महामारीचा पुढील मोठा धोका लक्षात घेऊन आमच्या या सर्व मागण्यांचा विचार करून लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

मनसे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, सुशील गायकर, माजी सरपंच रामदास आडोळे, हरीश चव्हाण, कैलास भगत, उपतालुका प्रमुख संजय सहाणे, भोलेनाथ चव्हाण, रामदास चव्हाण, विनोद चव्हाण, एकनाथ गायकर, कार्तिक गतीर, माधव दळवी, डॉ. युनूस रंगरेज, इगतपुरी शहराध्यक्ष सुमित बोधक, रावसाहेब सहाणे, संदीप नाठे, नागेश गायकर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा: सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा