नाशिक : परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobiles stolen of students sitting for exams

नाशिक : परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दुचाकी गाडीत मोबाईल ठेवले असता, सात ते आठ मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकी गाडीच्या डिकीतून चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ७) दुपारी घडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एका विद्यार्थ्याने उपनगर (Upanagr) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिटको महाविद्यालयात गुरुवारी बारावीचा (HSC) मराठी पेपर होता. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल दुचाकी गाडीच्या डिकीमध्ये ठेवले होते.

हेही वाचा: चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्यास जन्मठेप

दरम्यान, विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये पेपर देत असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या या विद्यार्थ्यांच्या दुचाकी गाडीतून सात ते आठ मोबाईल चोरून नेले. पेपर संपताच विद्यार्थी बाहेर आले, तेव्हा त्यांना मोबाईल चोरी झाल्याचे आढळले. काही विद्यार्थिनींचे ही मोबाईल चोरी गेले असल्याचे समजले. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या पोलिस चौकीत जाऊन पोलिसांशी संपर्क साधला व मोबाईल चोरी गेल्याची माहिती दिली.

हेही वाचा: वळवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत | Nashik

Web Title: Mobiles Stolen Of Students Sitting For Exams Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..