वळवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत | Nashik

fear among citizens of Valwadi about leopards
fear among citizens of Valwadi about leopardsesakal

विराणे (जि. नाशिक) : येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांची गावाच्या उत्तरेला पडीक शेतजमीन आहे. त्या ठिकाणी हरणांचा नेहमीच वावर असतो. जवळच गावठाण, तलाव असल्याने पाण्यासाठी हरणांचे कळप येथे आश्रय घेतात. मात्र, बिबट्यामुळे (Leopard) हरणांचा अधिवास धोक्यात आला. बिबट्याच्या हल्ल्यात एका हरणाला (Deer) प्राण गमवावे लागल्यामुळे वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आजही तेरा ते पंधरा हरणे वास्तव्यास आहेत. पाच ते सहा हरणांनी पिलांना जन्मदेखील दिला आहे. जवळच अभिमन संतोष पाटील, तुकाराम पवार यांची डाळिंब बाग असल्याने हरणे बागेच्या थंडाव्याचा देखील आश्रय घेत असतात. त्यांच्या घरातील महिला हरणांसाठी नेहमीच कुंडी, टप भरून पाणी ठेवतात. परंतु, वनविभागाने या वन्यजीवांसाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. बिबट्याच्या वावरामुळे हरणांचे वास्तव्य धोक्यात आले आहे.

fear among citizens of Valwadi about leopards
बॉयफ्रेंडकडून महिन्याला तब्बल ८० लाख रुपये 'पगार' घेणारी गर्लफ्रेंड

शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली

काटवन परिसराला नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगल लाभलेले आहे. या जंगलात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. उन्हाळ्यात झरे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात शेजारील गावांमधील पाणवठ्याशेजारी नेहमीच आश्रय घेतात. याचा त्रास नेहमीच पाळीव प्राण्यांना होतो. शेतकरी देखील बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असतात. दरवर्षी पाळीव प्राण्यांना जीवाला मुकावे लागते. अनेकवेळा तक्रार करूनही वनाधिकारी दुर्लक्ष करतात. कुठलीही मदत स्थानिकांना तालुकाधिकाऱ्यांकडून होत नाही. स्थानिक वनकर्मचारी मात्र सहकार्याच्या भूमिकेत असतात. विराणे येथील वनपाल प्रकाश खैरनार, वनरक्षक तुषार देसाई यांनी घटनास्थळी भेट देत मृत हरणाचा पंचनामा केला.

fear among citizens of Valwadi about leopards
नाशिक : पंतप्रधान आवास योजनेपासून लाभार्थी वंचित

"उन्हाळ्याचे दिवस आहेत. भटकी कुत्री, बिबटे पाण्यासाठी भटकंती करतात. विराणे विभागात कंक्राळे परिसरात पाण्याची व्यवस्था केली आहे. वरिष्ठांची मदत घेऊन लवकरच वळवाडी परिसरात पाण्याची व्यवस्था करू."

- प्रकाश खैरनार, वनपाल, विराणे

"दरवर्षी परिसरात पाळीव प्राणी, वन्यजीवांना प्राण गमवावे लागतात. तालुका प्रशासनाचे कुठलेही धोरण नाही. पुर्णतः दुर्लक्ष आहे. गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करतो. फोन केला तर तालुका अधिकारी फोन उचलत नाही. यापुढे अशी घटना घडल्यास तालुका वनविभागावर गुन्हे दाखल करू."

- राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, वळवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com