Nashik News : देशातील जुन्या संचांचे आधुनिकीकरण; 2030 पर्यंत संच चालविण्याचे CEAचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Electricity Authority

Nashik News : देशातील जुन्या संचांचे आधुनिकीकरण; 2030 पर्यंत संच चालविण्याचे CEAचे निर्देश

एकलहरे (जि. नाशिक) : देशातील २१० मेगा वाट चे जुने संच २-३ वर्षांपूर्वी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

परंतु कोरोना साथी नंतर देशात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून येत्या उन्हाळ्यात ती अजून वाढेल म्हणून देशातील ८२ जुन्या संचाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे, असा केंद्रीय मंत्र्यांच्या व सीइए च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

त्यात राज्यातील नाशिक, खापरखेडा, चंद्रपूर येथील संचांचा समावेश आहे. (modernization of old electricity sets in country CEA directive to drive set by 2030 nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

नाशिक २१० मेगावॉटचे संच ३ व ४, खापरखेडा २१० मेगावॉटचे संच अनुक्रमे एक ते चार, चंद्रपूरचे २१० मेगावॉटचे संच ३ व ४ तर ५०० मेगावॉटचे संच अनुक्रमे ५ ते ७ अशा संचाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

देशात डिसेंबर २०२३पर्यंत सुमारे १५-१६ गिगा वॉट नवीन थर्मल क्षमता अपेक्षित आहे, हे देखील CEA च्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार डिसेंबर २०२३ नंतर विचारात घ्यायचे असल्यास आयुर्विस्तारासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचे ३० वर्षांहून अधिक काळचे १०,६३० मेगावॉटचे ४८ संच, २५ ते ३० वर्ष कालावधीतील ४९०० मेगावॉट चे १९ संच व २० ते २५ वर्ष कालावधीतील ३१९० मेगावॉट चे १५ असे एकूण ८२ संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण नियोजित आहे.

महानिर्मितीकडून विचारणा

महानिर्मिती कंपनी ने नाशिक, चंद्रपूर, खापरखेडा या वीज केंद्रांना (स्थानिक प्रशासनास) सदर जुन्या संचांचे कुठली कुठली कामे करता येईल याबाबत विचारणा केली आहे. मंत्री मंडळ व सीईएच्या निर्णयामुळे २१० व ५०० मेगावॉटच्या ८२ संच ज्यांची निर्मिती क्षमता १८७२० मेगावॉट आहे., या प्रकल्पांना २०३० पर्यंत किंवा आणखी वाढीव काळाची नवसंजीवनी मिळेल, यात शंका नाही.