esakal | नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : काही कामगारांना ताब्यात घेण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

nashik press

नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : काही कामगारांना ताब्यात घेणार?

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : चलार्थपत्र मुद्राणालयात पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीप्रकरणी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी चौकशी केली. चौकशीसाठी काही कामगारांना ताब्यातही घेण्याची शक्यता आहे. या चोरीमुळे पुन्हा एकदा चलार्थपत्र मुद्राणालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील चलार्थपत्र मुद्रणालयामधून एक हजार नोटा असलेले पाचशेचे एक बंडल २९ जून २०२१ पूर्वी चोरी झाल्याची तक्रार चलार्थपत्र मुद्राणालयाचे सहाय्यक व्यवस्थापक अमित शर्मा यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. (money-theft-case-in-nashik-press-marathi-news-jpd93)

काही कामगारांना ताब्यातही घेण्याची शक्यता

दरम्यान, ही घटना ही फेब्रुवारीत घडली. कोरोनामुळे चलार्थपत्र मुद्राणालय दोन ते अडीच महिने बंद होते. यामुळे ही घटना लक्षात आली नाही. परंतु, आता हा प्रकार उघडकीस येताच चलार्थपत्र मुद्राणालय कामगारांमध्ये व व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली. या नोटा खरंच चोरी झाल्या आहेत, की याबाबत तपास सुरू आहे. तसेच खराब झालेल्या नोटा चलार्थपत्र मुद्राणालय आवारात जाळण्यात येतात. या नोटा या भंगाराच्या साहित्यामध्ये जातात. त्यामुळे भंगारात जाळल्या असाव्या, अशी चर्चा कामगारांमध्ये आहे. मात्र, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. परिणामी नोटा चोरीप्रकरणी तपास पोलिसांकडे गेल्याने चौकशी सुरू आहे.

आठवड्यापासून तक्रार करण्याबाबत चालढकल

नाशिक रोडला पासपोर्ट, चेक्स, पोस्टल स्टॅम्प, सरकारी मुद्रांक आदीची छपाई करणारी भारत प्रतिभुति मुद्रणालय तर नोटांची छपाई करणारी चलार्थपत्र मुद्रणालय आहे. दोन्ही ठिकाणी अभेद्य सुरक्षा भिंत आहे. भिंतीच्या कोपऱ्यावर टॉवर असून, तेथे चोवीस तास सशस्त्र सुरक्षारक्षक असतात. गेटवर व आत सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात असतात. सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे आहे. मुद्रणालय मध्ये कामगार- अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश नसतो. कामगारांची यंत्राच्या सहाय्याने कसून तपासणी होते. प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहे. नोटा छपाईसाठी आधुनिक यंत्रांचा वापर होते. या कडेकोट सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुद्रणालयामध्ये नोटांची चोरी होणे अथवा नोटा गहाळ होणे याला महत्व प्राप्त झाले आहे. सहा महिने झाले तरी मुद्रणालयने याबाबत तक्रार न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, आठवड्यापासून तक्रार करण्याबाबत चालढकल सुरू होती.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image