
नाशिक : आनंदवल्ली येथे गरबा पाहण्यासाठी गेलेल्या सासू व जावयावर संशयितांनी मागील वादाची कुरापत काढून कोयत्याने वार करून जखमी केल्याचा प्रकार घडला. मनोहर रामकिसन गायकवाड (२३, रा. माळीवाडा, आनंदवल्ली, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. (mother in law son in law hit with axe Nashik Latest Crime News)
चेतन दत्तू बेजेकर (रा. कोळीवाडा, आनंदवल्ली, गंगापूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.१) रात्री चेतन व त्याची होणारी पत्नी व सासू हे आनंदवललीतील मनपा शाळा क्रमांक७१ येथे गरबा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागील वादाची कुरापत काढून संशयित मनोहर याने पाठीमागून येऊन कोयत्याने चेतन याच्या मानेवर मारून दुखापत केली.
तर त्यास वाचविण्यासाठी सासू सविता नेताजी शिंदे या आल्या असता त्यांच्याही हातावर कोयता मारल्याने त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली. तसेच संशयिताने शिवीगाळ करीत पाहून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मनोहर याच्याविरोधात रांजनगाव पोलीस ठाण्यात (पुणे) मारहाणीचा गुन्हा दाखल असून, त्यास रविवारी (ता.२) गंगापूर पोलिसांनी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.