Motivational Story : गॅस शेगडी, मिक्सर, कुकर दुरुस्तीतून उभं केलं कुटुंबाला; पुष्पाताईंचा प्रेरणादायी प्रवास

Pushpatai Dev-Purkar
Pushpatai Dev-Purkaresakal

Nashik News : जगण्याची वाट भक्कम करत असतानाच प्रत्येकाच्या वाट्याला येणारे चढ-उतार नक्कीच जगण्याची दिशा ठरवत असतात. या चढ-उतारांना पार करायचे असेल, तर परिस्थितीशी दोन हात करावेच लागतील, अशी मनाशी जणू तिनं खूणगाठच बांधली.

परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलं... कष्ट जणू माहेरूनच पाचवीला पुजलेलं... मात्र कष्टाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड देत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गॅस शेगडी, गिझर रिपेअरिंग व्यवसायातून कुटुंबाला उभे केले ते नवीन नाशिक येथील पुष्पाताई देव-पुरकर यांनी.(Motivational Story of inspirational women Pushpatai Devpurkar Gas geyser mixer cooker were repaired for family Nashik News)

धुळे तालुक्यातील शिरुड येथील माहेर असलेल्या पुष्पा शशिकांत देव यांचं शिक्षण जेमतेम दहावी... सासर स्टेशन नांदगावचे... वडील काशीनाथ झिप्रू पुरकर यांचे पत्नी चंद्रकला यांच्यासह तीन मुली, एक मुलगा असं मोठं कुटुंब... कसण्यासाठी तुटपुंजी शेती होती.

मात्र मुलींच्या लग्नाची जबाबदारी कमी करताना शेती विकण्याशिवाय पर्याय नव्हता. भूमिहीन झालेल्या कुटुंबाला दोन वेळच्या खाण्यासाठी किराणा दुकानात काम करत कुटुंबाला दोन वेळ पोटभर अन्न मिळविण्याची धडपड सुरू झाली.

घरातील परिस्थितीमुळे लग्न लवकर झाल्याने पुष्पाताईंचेही शिक्षण अर्ध्यावरच सुटले. आयुष्यातील कष्टमय परिस्थितीला सामोरे जाताना पुष्पाताईंचा विवाह नांदगाव येथील शशिकांत देव यांच्याशी झाला. पती शशिकांत यांचंही शिक्षण दहावी... सासरी देव कुटुंबाचीही रोजची ओढाताण जणू ठरलेलीच होती. त्यामुळे कुटुंबाने नाशिकमध्ये रोजगारासाठी आपले बस्तान हलवले होते.

Pushpatai Dev-Purkar
Nashik Crime : गुन्हेगारांविरोधात पोलिस आयुक्त आक्रमक; धडक कारवाईच्या सूचना

परिस्थितीशी लढणारं १४ जणांचं कुटुंब

कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावं, यासाठी नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या देव कुटुंबातील १४ सदस्यांनी दोन रूमच्या घरात कुटुंबाला स्थिर केलं. पुष्पाताई यांचे सासरे अंबड भागात हातगाडीवर मसालेविक्री करत, तर अन्य सदस्यही रोज दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून कुटुंबाला हातभार लावत होते. परिस्थिती कशीही असली तरी तिला बसून राहण्याची मुभा नाही, या सकारात्मक विचारांची पुष्पाताईंना जाणीव असल्याने संधी शोधत होत्या.

नवीन नाशिक परिसरातील चाकरमान्यांच्या वस्तीतील कुटुंबांची गरज ओळखून पतीसोबत पुष्पाताई यांनी किचनमधील घरगुती वस्तू दुरुस्ती करण्याचे काम शिकून घेण्याची इच्छा व्यक्त केली. पुष्पाताई यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला पतीने प्रोत्साहन देत त्यांची व्यवसायाप्रति असलेली आवड जोपासली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pushpatai Dev-Purkar
Motivational Story : ‘Farmer ते fortuner प्रेरणादायी प्रवास..!

पुष्पाताई यांना गॅस शेगडी, गिझर, कुकर, मिक्सर आदींसह वेगवेगळी उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले. पती शशिकांत नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पिंपळगाव, नाशिक तालुक्यात या कामांसाठी घराबाहेर असल्याने नाशिकमध्ये पुष्पाताई स्वतः दुरुस्तीसाठी सरसावल्या. पहिल्याच दिवशी शेगडी दुरुस्तीच्या कामातून त्यांना ५० रुपयांची कमाई झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने पुष्पाताई यांच्यातील दुरुस्ती कारागीर कुटुंबासाठी भक्कम आधार ठरला.

पुष्पाताईंनी दोन्ही मुली सृष्टी आणि गौरी यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले आहे. मुली उच्चशिक्षित होत असतानाच या व्यवसायात लहान मुलगी गौरीने स्वतःची ओळख उभी करावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्यातील आलेल्या चढ-उतारांबद्दल बोलत असताना पुष्पाताई यांचे अनेकदा डोळे पाणावले.

Pushpatai Dev-Purkar
Motivational Story : एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया! ; संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार

महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यास तयार

गृहोपयोगी वस्तूंची प्रत्येक कुटुंबातील वाढती गरज लक्षात घेता महिलांना या व्यवसायात संधी असल्याने नक्कीच महिलांनी पदार्पण करावे. ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाकडून सुचविलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचीही तयारी पुष्पाताई यांनी दर्शविली आहे.

आयुष्यातील आलेल्या प्रत्येक प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जाताना देव कुटुंबाला आधार देतानाच परिस्थितीला सामोरे जाण्याचा सारीपाठच पुष्पाताई देव-पुरकर यांनी खचून गेलेल्या घटकांसमोर ठेवलाय.

Pushpatai Dev-Purkar
Motivation : मजुराची मुलगी पोलिस झाली अन्‌ दोनच महिन्यांत थेट पोलिस उपनिरीक्षक बनली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com