esakal | अरे व्वा! ...तर हे कोविड सेंटर होणार बंद; कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय
sakal

बोलून बातमी शोधा

covid center 123.jpg

कोरोना संसर्ग उतरणीला लागल्याने ऑक्टोबरमध्ये कोविड सेंटरमधील बेड रिक्त होत असल्याने आठवडाभरातील स्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने काही कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचाली वैद्यकीय विभागाकडून सुरू झाल्या आहेत.

अरे व्वा! ...तर हे कोविड सेंटर होणार बंद; कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्ग उतरणीला लागल्याने ऑक्टोबरमध्ये कोविड सेंटरमधील बेड रिक्त होत असल्याने आठवडाभरातील स्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने काही कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचाली वैद्यकीय विभागाकडून सुरू झाल्या आहेत.

काही कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचाली 
आयुक्त कैलास जाधव यांनी उतरणीचा वेगाचा अभ्यास करून सेंटर बंद करण्याच्या सूचना केल्या असून, नाशिककरांसाठी ही आशादायक बाब म्हणता येईल. एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळल्यानंतर महापालिकेने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाची इमारत, मेरी येथील मुलींचे वसतिगृह, तपोवन व क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने ठक्कर डोम येथे कोविड सेंटरची उभारणी केली.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

घटत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून निर्णयाच्या सूचना 

एक हजार ५५० बेड महापालिकेने उभे केले असताना खासगी रुग्णालयेदेखील कोविड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आली. त्याव्यतिरिक्त शासकीय रुग्णालयांतही बेड उपलब्ध करून देण्यात आले. चार हजार ५४२ बेडची निर्मिती करण्यात आली होती. मेअखेर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत हजाराच्या पटीत रुग्ण आढळत पन्नास हजारी पार रुग्णांची संख्या पोचली. मात्र, ऑक्टोबरमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झाले. रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांमध्ये बेड रिक्त होण्याचे प्रमाण वाढले. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

...तर हे सेंटर होणार बंद 
सध्या चार हजार ५४२ पैकी अवघ्या एक हजार ५१९ बेडवर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार ५८४ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. त्यामुळे रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन नवीन बिटको, डॉ. झाकिर हुसेन वगळता मेरी येथील वसतिगृह, समाजकल्याण विभाग व ठक्कर डोम येथील सेंटर बंद केले जातील. त्यापूर्वी आठ दिवसांची कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. 

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने कोविड सेंटरमधील बेड रिक्त आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही सेंटर बंद करण्याचा विचार सुरू आहे. -कैलास जाधव, आयुक्त, महापालिका  

संपादन - ज्योती देवरे 

loading image
go to top