MP Assembly Election: राजधानीत भाजप मजबूत! उत्तर- मध्य भोपाळ जागेवर काँग्रेस अडचणीत

MP Assembly Election
MP Assembly Election

MP Assembly Election : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपसमोर काँग्रेसने तगडे आव्हान उभे केले. मात्र राज्याची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये भाजपसमोर काँगेसची पीछेहाट होते आहे.

काँग्रेसमधील गटबाजी आणि बँडखोरीमुळे दोन जागा त्यांच्या हातातून जात आहेत, असे दिसते. (MP Assembly Election BJP strong in capital Congress in trouble in north central Bhopal seat Political news )

भोपाळ मध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या 2018 च्या निवडणुकीमध्ये भाजपने चार जागा तर काँग्रेसने 2003 नंतर तीन जागा जिंकल्या होत्या गोविंदपुरा नरेला हुजूर आणि बैरसिया या जागांवर भाजपचा कब्जा कायम होता तर काँग्रेसने मध्यगोपाळ आणि दक्षिण पश्चिम भोपाळ या दोन जागा हिसकावून घेत उत्तर भोपळाची जागा कायम राखत तीन जागा जिंकल्या होत्या.

यावेळी काँग्रेसने राज्यात भाजप विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा घेत मोठे आव्हान उभे केले आहे. असे असले तरी राजधानी भोपाळ माध्यमातून चित्र उलटे असून काँग्रेस समोर आहे. त्या जागा टिकविण्याची आव्हान उभे केले आहे.

काँग्रेसच्या दोन जागा धोक्यात

सद्यस्थितीत उत्तर गोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आरिफ अकिल आहेत. यावेळी मात्र त्यांचा मुलगा आतिफ अकील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आमदार अखिल यांचे बंधू अमीर यांनी बंडखोरी केली आहे.

परिणामी मत विभाजनाचा फटका बसून त्याचा फायदा भाजपाचे उमेदवार आलोक शर्मा यांना होण्याची शक्यता आहे शर्मा यांनी 2003 मध्ये नशीब आजमावले होते. त्याचप्रमाणे मध्यगोपाळ मतदार संघातून काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी दिसून येते 2018 मध्ये भाजपचे सुरेंद्रनाथ सिंह यांना पराभूत करून विजयी झालेल्या मसुद यांच्यासमोर भाजपचे माजी आमदार द्रवनारायण सिंह यांनी आव्हान उभे केले आहे.

MP Assembly Election
MP Assembly Election: अखेरच्या टप्प्यात दिग्गज मैदानात; पंतप्रधान मोदी, शहा, राहुल गांधी, खर्गे यांच्या सभा, रोडशो

या दोन्ही जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या असल्या तरी आज मी 30 धोक्यात आलेल्या आहेत जुने भोपाळ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम बहुल मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.

दक्षिण पश्चिम भोपाळमध्ये जोरदार लढत

भोपाळ शहराची मुख्य बाजारपेठ असलेली व हाय प्रोफाईल मतदार असलेला हा मतदार संघ काँग्रेसच्या कब्जातून हिरावून घेण्यासाठी भाजपाने पूर्णता कधीचे प्रयत्न केले आहेत 2018 मध्ये भाजपचे तत्कालीन मंत्री उमा शंकर गुप्ता यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार पीसी शर्मा यांनी 7000 मतांनी पराभूत केले होते हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागलेला आहे.

त्यामुळे यावेळी भाजपने पुन्हा गुप्ता यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिलेली आहे मात्र असे असले तरी शर्मा यांचे काम आणि जनसंपर्क यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

MP Assembly Election
MP Assembly Election: महाकौशल्य, नेमाड प्रांतवर काँग्रेसची भिस्त; विंध्यचा गड राखण्याचे भाजपसमोर आव्हान

पुन्हा 6-1 ?

# 2003 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने चार तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या

# 2008 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सहा तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता

# 2013 मध्ये भाजपने आपले गड शाबूत ठेवले होते

# सर गेल्या 2018 मध्ये पुन्हा भाजपला दोन जागा कमवाव्या लागल्याने चार तर काँग्रेस तीन जागांवर जिंकली होती

# 2023 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपला 2003 ची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.

अशा आहेत लढती

^ उत्तर भोपाळ

# आतिफ अकिल (काँग्रेस) Vs आलोक शर्मा (भाजप)

* मध्य भोपाळ

# आ. आरिफ मसूद Vs ध्रुव नारायण सिंह (भाजप)

* गोविंदपुरा

# आ. कृष्णा गौर (भाजप) Vs रवींद्र साहू (काँग्रेस)

* दक्षिण पश्चिम भोपाळ

# आ. पी.सी. शर्मा (काँग्रेस) Vs उमाशंकर गुप्ता (भाजप)

* नरेला

# विद्यमान मंत्री विश्वास सारंग (भाजप) Vs मनोज शुक्ला ( काँग्रेस)

* बैरसिया

# आ. विष्णू खत्री (भाजप) Vs जयश्री हरिकरन (काँग्रेस)

MP Assembly Election
MP Assembly Election: तोमर व्हिडिओवरून भाजप अडचणीत; काँग्रेस पक्षाकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com