esakal | राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा; खासदार भारती पवार यांचे बैठकीत आदेश

बोलून बातमी शोधा

MP Bharti Pawar
राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा; खासदार भारती पवार यांचे बैठकीत आदेश
sakal_logo
By
रतन चौधरी

सुरगाणा (जि. नाशिक) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली असली, तरीही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गुजरातचा सीमावर्ती भाग कोरोना स्प्रेडर्स बनल्याचे वृत्त ‘सकाळ'मध्ये मंगळवारी (ता. ४) प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह स्थानिक यंत्रणा ॲक्शन मोडवर आली. याबाबत खासदार डॉ. भारती पवार (MP Bharti Pawar) यांनी मंगळवारी स्थानिक प्रशानासोबत बैठक घेऊन सीमावर्ती भागात नाकाबंदी वाढविण्यासह उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. (MP Bharti Pawar suggested measures to be taken including increasing blockade in border areas)


गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून राज्याच्या सीमावर्ती भागातील हतगड, तळपाडा, श्रीभूवन, करंजूल (क), खुंटविहीर, पिंपळसोंड, हडकाईचोंड, बर्डीपाडा, रघतविहीर, मांधा, निंबारपाडा, राक्षस भुवन, सागपाडा, खिर्डी गावे जवळ आहेत. ये-जा करण्यासाठी ई-पास घेणे आवश्यक असतानाही नाकाबंदीबाबत प्रशासनाचे कागदी घोडे नाचविणे सुरू होते. याबाबत ‘सकाळ'च्या बातमीदारांनी आढावा घेऊन सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल खासदार डॉ. भारती पवार यांनी घेऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. या बैठकीला तहसीलदार किशोर मराठे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, गटविकास अधिकारी दीपक भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला


उपाययोजनेच्या सूचना

या गावात नाकाबंदी करण्यासाठी वनविभागाचे उपतपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. याच सीमावर्ती भागाला कोरोनाचा विळखा पडला असून, नागरिकांची ये-जा थांबविण्यासाठी बोरगाव, बर्डीपाडा, उंबरठाण, बा-हे या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!