
Nashik : खासदार साक्षी महाराजांचा राज ठाकरेंना सल्ला
मालेगाव (जि. नाशिक) : भारत जगातील सर्वांत मोठे लोकतांत्रिक राष्ट्र (Democratic Nation) आहे. देशातील प्रत्येक हिंदू, मुस्लि, शीख, इसाई यांसह दलित, लहान, मोठा प्रत्येक जाती, धर्माच्या नागरिकाला अटक से कटक व काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. देशभरात कोणतीही व्यक्ती कोठेही येऊ-जाऊ शकते. तथापि राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषा (Unparliamentary language) वापरली आहे. जी त्यांना शोभा देत नाही. त्यांचा अंतरआत्मादेखील हे सांगत असेल. त्याच हेतूने त्यांनी सन्मानाने उत्तर भारतीयांची (North Indians) क्षमा मागावी, असा सल्ला खासदार साक्षी महाराज यांनी दिला. (MP Sakshi Maharajs advice to Raj Thackeray Nashik News)
खासदार साक्षी महाराज खासगी दौऱ्यावर शहरातील महेशनगर भागातील मतीन खॉँ, समीर शेख यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की हिंदू-मुस्लिम (Hindu muslim) वाद निरर्थक आहे. हा वाद केव्हाच संपला असून, आता फक्त राष्ट्रवादाला साथ आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘सब का साथ सबका विकास’ या माध्यमातून मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपशी जोडला गेला आहे. मी स्वत: आज मतीन खॉं व समीर शेख यांच्या निमंत्रणावरुन मुस्लिम कुटुंबाच्या भेटीसाठी मालेगावला आलो आहे. वाराणसीत हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा वाद आक्रमणकर्ते (आक्रांता) व देशाचा आहे. देशावर आक्रमण करणारे सर्वांचे दुश्मनच होते. देश आहे तर आपण आहोत. त्यामुळे आम्ही राष्ट्राची राजनीती करतो. देशातील १३२ कोटी जनता आमची आहे. सर्वांनी प्रेम व सौदार्हाने राहणे गरजेचे आहे. खासगी दौऱ्यावर आलेल्या साक्षी महाराजांचे शेख कुटुंबीय व भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शेख कुटुंबियांकडे चहा, नाश्ता घेतल्यानंतर ते रवाना झाले.
हेही वाचा: पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस शिक्षा
खासदार साक्षी महाराज यांनी शहरात आल्यानंतर शेरो शायरीतून आपल्या स्वभावाची प्रचिती दिली. महाराष्ट्राशी माझे निकटचे संबंध आहे. हे सांगताना त्यांनी मुंबई, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे माझे आश्रम आहे. माझी प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मरे करीब आवो तो शायद जान सके मुझे’, माझ्या जवळ आलेला कायमचा माझा होतो. हिंदू-मुस्लीम सलोख्यावर बोलताना त्यांनी प्यार-मोहब्बत जज्बात कभी रुठा नही करते, रिश्ते है जन्मो के कभी टुटा नही करते । हा शेर सुनावला.
हेही वाचा: Corona Update : शहरात तब्बल 3 महिन्यानंतर आढळला कोरोनाचा रुग्ण
Web Title: Mp Sakshi Maharajs Advice To Raj Thackeray Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..