
नाशिक : कोरोनाच्या काळात नाशिक महापालिकेने जो पॅटर्न राबवला आहे. त्याबद्दल खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आयुक्त गमे यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नाशिकमध्ये राबविण्यात आलेल्या पॅटर्नची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.नाशिक महापालिकेचे आयुक्त रामकृष्ण गमे आणि त्यांच्या टीमचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात....
नाशिक महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये शहरातील रस्त्यांवर २८७ कामगार व १३ पंपांच्या मदतीने जंतुनाशके फवारण्यात येत आहेत. याशिवाय क्वारंटाईन केलेल्या परिसरातील कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील ७४८ मेडिकल ऑफीसर्स व दीड हजार स्वच्छता कर्मचारी यांना पीपीई किटस् पुरविण्यात आले आहेत. शिवाय १४ खासगी संस्थांच्या माध्यमातून ७२ खाटांची सोय क्वारंटाईन वार्डासाठी करण्यात आली आहे. सील केलेल्या परिसरातील ८ हजाराहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर्स व आरोग्यसेवक अशी २२ जणांची टीम तैनात आहे.
त्या पुढे म्हणतात....
मोहिमेत काम करणार्या व्यक्तींच्या परस्पर संवादासाठी 'महाकवच' अॅप व नागरिकांना जीवनावश्यक सेवा घरपोच प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून 'नाशिक बाजार' या अॅपचीदेखील निर्मिती करण्यात आली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश पाठविण्यात येत आहेत.महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कार्यरत असणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी 'अभय' बॉडी सॅनिटायझिंग मशिन कार्यान्वित करण्यात आले. आशा कर्मचारी,परिचारिका यांच्या माध्यमातून घरोघरी कोविड-१९ संदर्भात सर्वेक्षण व सामाजिक जनजागृती करून तपासणी तसेच होम क्वारंटाईन केलेल्या सर्व व्यक्तींना सातत्याने फोनद्वारे संपर्क व प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात आला आहे...
सर्व उपाययोजनांबद्दल आयुक्तांचे अभिनंदन
नाशिकमधील मुख्य भाजीपाला बाजारांची विभागणी करून शहरामध्ये वेगवेगळ्या १०६ ठिकाणी भाजीपाला विक्री उपलब्ध करुन दिली आहे.याशिवाय ज्येष्ठ नागरिक व विकलांग नागरिकांसाठी महापालिकेमार्फत विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांबद्दल नाशिकचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व त्यांच्या टीमचे अभिनंदन असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.