mpsc exam
mpsc examesakal

MPSC PSI Exam: उपनिरीक्षकपदाच्‍या पेपरसाठी 486 उमेदवारांची उपस्‍थिती

MPSC PSI Exam : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ‘ब’ मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पेपर क्रमांक २ चे आयोजन रविवारी (ता. २९) केले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षकपदासाठी घेतलेल्‍या या परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून ४८६ उमेदवारांनी हजेरी लावली. (MPSC PSI Exam 486 Candidates Appear for Sub Inspector Post Paper nashik)

mpsc exam
Nashik News: नाशिकमध्ये कैद्याच्या पोटात निघाली ‘किल्ली’! किल्ली नेमकी कुणाची, याचा तपास सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पहिला पेपर ऑक्‍टोबरच्‍या सुरवातीस घेण्यात आला होता. त्‍यानंतर पदनिहाय पेपर क्रमांक २ चे आयोजन आयोगातर्फे केले जाते आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पेपर २ घेण्यात आला. तत्‍पूर्वी या परीक्षेसाठी उमेदवारांची प्रवेशपत्र गेल्‍या आठवड्यात उपलब्‍ध करून दिले होते. परीक्षा वेळेच्‍या एक तास आधी उमेदवारांनी उपस्‍थित राहावे, अशा सूचना आयोगाने केल्‍या होत्‍या.

नाशिक जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर एकूण ५६९ उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. यापैकी ४८६ उमेदवारांनी परीक्षेला हजेरी नोंदविली, तर ८३ उमेदवार गैरहजर होते. या परीक्षेच्‍या नियोजनासाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती.

mpsc exam
Nashik News: गोदाघाटावर रखडली ‘स्मार्ट’ प्रकल्पाची कामे! उंचवटा, खोलगट भागामुळे दुचाकी घसरण्याच्या प्रकारात वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com