NMC To MSEDCL : फेब्रुवारी महिन्यात महावितराणाद्वारे चक्क 61 वेळा वीजपुरवठा खंडित! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water and electricity crisis in dhule news

NMC To MSEDCL : फेब्रुवारी महिन्यात महावितराणाद्वारे चक्क 61 वेळा वीजपुरवठा खंडित!

नाशिक : शहरात वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा रोष पाणीपुरवठा विभागाला सहन करावा लागत आहे.

मात्र, पाणीपुरवठा खंडित होण्यामागे वीजपुरवठा (MSEDCL) खंडित होण्याचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. (MSEDCL interrupted power water supply 61 times in February nashik news)

मागील २८ दिवसांमध्ये तब्बल ६१ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने तितक्याच वेळा पाणीपुरवठादेखील बंद झाला. त्या पार्श्वभूमीवर महावितरणशी पत्रव्यवहार करून अचानक वीजपुरवठा खंडित करू नये अशी विनवणी महापालिकेकडून करण्यात आली.

जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्यास जलकुंभापर्यंत पाणी पोचण्यात अडचणी निर्माण होतात. आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्यास पुढचा एक दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीजपुरवठा खंडित करायचा झाल्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविणे अपेक्षित आहे.

त्यानुसार अतिरिक्त पाणी उपसून जलकुंभामध्ये भरण्याची व्यवस्था केली जाते. मात्र मागील २८ दिवसांमध्ये ६१ वेळा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे तितक्याच वेळा पाणीपुरवठादेखील झाला नाही.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

गंगापूर पंपिंग स्टेशनवर सहा वेळेस शिर्डी पंपिंग स्टेशनवर, दोन वेळेस मुकणे पंपिंग स्टेशनवर, नऊ वेळा बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रावर, दहा शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर, पाच विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावर, सहा नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रावर, दोन गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर,

सहा निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावर, दहा गोपाळनगर पंपिंग स्टेशनवर दोन, तर बोरगड पंपिंग स्टेशन येथे तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या त्या भागातील पाणीपुरवठादेखील बाधित झाला. त्यामुळे महापालिकेने महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महापालिकेला आगाऊ कल्पना द्यावी जेणेकरून पाणीपुरवठ्या संदर्भात स्वतंत्र व्यवस्था करता येईल असे कळविले आहे.

"मागील २८ दिवसांमध्ये ६१ वेळा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. महावितरणने पूर्वकल्पना दिल्यास स्वतंत्र व्यवस्था करता येऊ शकेल. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला." - अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

टॅग्स :NashiknmcMSEDCL